| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जानेवारी २०२५
सुसंस्कृत. अभ्यासू. संघटक सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेले आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांचे अशा स्थान असलेले आणि कडेगाव पलूसचे एक धडाडीचे आमदार कार्यसम्राट. अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करणारे नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद. महापालिका. पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमताने निवडून आणायचे झाल्यास, आ. डॉ. विश्वजीत कदम यांनाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करावी, अशी विनंती ही शेवटी सुभाष खोत यांनी केली आहे.
या पत्रकात खोत यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आवश्यक आहे, अन्यथा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची जी अवस्था झाली तीच परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा सुभाष खोत खजिनदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला एका पत्रकाद्वारे केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या नेत्यांनी तेच तेच मुख्यमंत्री. तेच ते प्रदेशाध्यक्ष या सर्व चेहऱ्यांना जनता वैतागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यास आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याशिवाय पर्याय नाही. माजी मुख्यमंत्री किंवा माजी प्रदेशाध्यक्ष हे चेहरे आता तरुणाईमध्ये चालत नाहीत. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुण वर्ग नाराज आहे.
अशा या कठीण प्रसंगी वरिष्ठ नेत्यांनी थोडा त्याग करून, तरुण तडफदार अशा नेतृत्वाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये काम करण्याची संधी द्यावी. कमी वयामध्ये आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे सर्वगुणसंपन्न आहेत. याचा फायदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घ्यावा आणि महाराष्ट्रातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी अशा नेतृत्वाचा सर्वसामान्याला कसा फायदा घेता येईल याची संधी द्यावी.