yuva MAharashtra सांगलीत राष्ट्रवादीतर्फे मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा !

सांगलीत राष्ट्रवादीतर्फे मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जानेवारी २०२५

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर होऊन ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने मराठवाडा नामांतर दिन साजरा करण्यात आला

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ " नामांतर सोहळ्यास ३० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाड्यातील बौध्द बांधवांकरिता ही अभिमानाची बाब आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी याकरिता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. राजकीय व सामाजिक अशा विविध पातळीवरील प्रचंड विरोध झुगारून, प्रसंगी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून बौद्ध समाजाचा १६ वर्षांचा लढा यशाच्या शिखरपर्यंत खऱ्या अर्थाने पवार यांनीच पोहचविला. त्यामुळे बौद्ध बांधवांच्या संघर्षांनंतर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होऊन मृत्युमुखी पडलेल्या अनुयायी वर्गास न्याय मिळाला. हा इतिहास व खरी महत्वाची माहिती समाजामध्ये पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर कार्यक्रम घेण्यात आला.


याच अनुषंगाने आज सांगली जिल्हा पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला व लढ्यातील बौध्द बांधवांना आदरांजली वाहण्यात आली .

यावेळी मा.नगरसेवक हरिदास पाटील, उत्तम कांबळे, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, संदीप व्हनमाने, अरुण चव्हाण, आकाराम कोळेकर, फिरोज मुल्ला, भारत चौगुले, विश्वासराव लोंढे, अभिजित रांजणे, कुमार वायदंडे, नंदकुमार घाडगे व अक्षय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.