yuva MAharashtra संतोष देशमुख प्रकरणी मोठी बातमी, आरोपी विष्णु चाटेचा कोठडीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ?

संतोष देशमुख प्रकरणी मोठी बातमी, आरोपी विष्णु चाटेचा कोठडीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ?

फोटो सौजन्य  - दै. सकाळ

| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. १४ जानेवारी २०२५

संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासन, पोलीस प्रशासन यांच्या भूमिकेवर समाजातून प्रश्नचिन्ह उमटत आहे. एकीकडे संतोष देशमुख यांचे बंधू आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याचवेळी या प्रकरणातील एक आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तसेच खंडणी प्रकरणी विष्णू चाटे याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याचे मुदत संपल्याने चाटे याला न्यायालयाला समोर हजर करण्यात आले, त्यावेळी विष्णू चाटे याला 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


न्यायालयात आरोपीच्या वतीने वकिलांनी न्यायालयात पोलिसाला सवाल केला की, विष्णू चाटे याना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मग या कालावधीत चौकशी का पूर्ण झाली नाही त्यामुळे आता पी सी आर कसा मागता येईल ? यावर सरकारी वकिलांना काहीच उत्तर देता आले नाही त्यामुळे आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

कायदे तज्ञांच्या मते विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याचा जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन व पोलीस प्रशासन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गंभीर नाही का ? असा सवालही केला जात आहे.