| सांगली समाचार वृत्त |
मंडणगड - दि. १४ जानेवारी २०२५
परवा राजापूरला जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांचे प्राण कंठाशी आलेले 50 प्रवाशांचे प्राण केवळ चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाने वाचले. या बातमीची शाई वाढत नाही तोपर्यंत काल दापोली आगाराची मुंबईकडे जाणारी बस शेणाळी घाटातील चिंचाळी धरणाजवळ बस चालकाचा ताबा सुटला... पण याही 41 प्रवाशांचे नशीब बनवत तर म्हणून प्राण वाचले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दाभोळ वरून दिनांक 12 जानेवारी रोजी मध्यरात्री 41 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली. यावेळी शेहनाळे घाटातील देशमुख बागेच्या पुढे चिंचाळी गाडीचे चालक व्ही. एस. गाडे यांचा बस वरील ताबा सुटला आणि रस्त्याकडेच्या 15 फूट खोल दरीत ही बस कोसळली. परंतु सुदैवाने पुढे असलेल्या झाडाला व दगडाला धडकून हे बस थांबली त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.
या घटनेची माहिती कळतच शेनाळे गावातील ग्रामस्थ सुनील साळवी दीपक सावंत भिकी कदम व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरखंडाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले व पुढील उपचारासाठी मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सदर अपघाताची माहिती मिळताच, दाभोळ एसटी आगाराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मंडळ ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची चौकशी केली व योग्य ते उपचार करण्यात आले.