yuva MAharashtra मगरीचे पिल्लू विकण्याचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट, सांगलीवाडीतील नागरिकाकडून मिळाला चोप !

मगरीचे पिल्लू विकण्याचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट, सांगलीवाडीतील नागरिकाकडून मिळाला चोप !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जानेवारी २०२५

मच्छीमारीसाठी गेल्यानंतर जाळ्यात अडकलेले मगरीचे पिल्लू घरी आणून बातमी ठेवले आणि त्याला 700 रुपये यांना विकण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगणात आला. हा प्रकार लक्षात येतात सांगलीवाडीतील नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत, हे मगरीचे पिल्लू काढून घेतले व याची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी हे मगरीचे पिल्लू ताब्यात घेतले.

सांगलीवाडीतील ज्योतिबा मंदिराजवळ ऊसतोड मजूर राहत आहेत. त्यातील एक तरुण मंगळवारी सायंकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याच्या जाळ्यात काही मासे आणि मगरीचे पिल्लू अडकले त्याने हे मगरीचे पिल्लू एका बाटलीत घालून तो घरी पोहोचला. मासे घरी देऊन तो मगरीचे पिल्लू विकण्यासाठी परिसरात आला होता. काही सजग नागरिकांच्या नजरेस ही बाब आली. तेव्हा नागरिकांनी त्याला पकडून ठेवले व चोपही दिला. 


यावेळी माझी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी याची माहिती काही प्राणिमात्रांना दिली व वन विभागाला पाचारण करण्यात आले. यावेळी वनपाल तुषार भोरे, वनरक्षक गणेश भोसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे मगरीचे पिल्लू ताब्यात घेतले व सायंकाळी उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. नागरिकांची सतर्कता व वनविभागाचे तत्परता यामुळेच या मगरीच्या पिल्लाला पुनर्जीवन मिळाले. 

गेल्या महिन्याभरातील मगरीच्या पिल्लाची विक्री करण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी सांगली नांद्रे रोडवर शिवशंभो चौकात, मगरीची काही पिल्ले विक्रीसाठी आणलेल्या एका तरुणाला असाच चोप देऊन ती मगरीची पिल्ले वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली होती.