yuva MAharashtra पीएनजी आयोजित 'अजिंक्य भारत' ला उत्स्फुर्त प्रतिसाद, देशभक्तीपर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध !

पीएनजी आयोजित 'अजिंक्य भारत' ला उत्स्फुर्त प्रतिसाद, देशभक्तीपर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध !

फोटो सौजन्य  - दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जानेवारी २०२५

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम "अजिंक्य भारत" रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. विष्णूदास भावे नाट्यमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. गाडगीळ कुटुंबातील सुमन गाडगीळ, मंजिरी गाडगीळ, अरुंधती गाडगीळ, शुभांगी गाडगीळ, अपर्णा गाडगीळ, सुखदा गाडगीळ, आणि हिमगौरी गाडगीळ यांच्या हस्ते हा सन्मानपूर्वक सोहळा पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी वंदे मातरम, ध्वज विजयाचा उंच धरा रे, नन्हा मुन्ना राही हूँ, शूर आम्ही सरदार, उषःकाल होता होता काळरात्र झाली, ओ देस मेरे, भारत हमको जानसे प्यारा है, जिस देश में गंगा बहती है आणि सागरा प्राण तळमळला यांसारखी अनेक देशभक्तीपर गीते सादर झाली. प्रत्येक गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि अनेक गाण्यांनी वन्समोअर घेतला.


कार्यक्रमाचे संयोजन परेश पेठे यांनी केले होते, तर निर्मितीत अभिषेक तेलंग, ओंकार धुमाळ, गौरी जोशी, कौस्तुभ जोगळेकर, आनंद कमते, सावणी प्रभुणे, स्मिता पाटील यांसारख्या अनेक कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने रंगत आणली. सूत्रसंचालन मनीष आपटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, "अजिंक्य भारत" या उपक्रमातील कलाकारांचा गाडगीळ कुटुंबाच्या सदस्यांनी सत्कार केला. यावेळी समीर गाडगीळ आणि मिलिंद गाडगीळ यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम देशभक्तीच्या भावनांना उजाळा देणारा ठरला आणि प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात एक आगळी भर घालणारा अनुभव रसिकांना मिळाला.