| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. २४ जानेवारी २०२५
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.35 वाजता विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर येथे अध्यात्मयोगि आचार्यश्री सिद्ध सागर जी महाराज यांचे सर्व धर्मीय देशभक्तीपर मंगल प्रयोजन आयोजित करण्यात आले आहे या मंगल प्रसंगी पूजा आचार्य श्रींच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. या सर्व धर्मीय देशभक्तीपर प्रवचनाला 108 आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज, प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे मंगल सानिध्या लागणार आहे.
नुकत्याच नांदणी येथे पार पडलेल्या भव्य पंचकल्याण पूजा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळ्यास, आपल्या मंगल सानिध्याने आणि मार्गदर्शनाने गौरव प्राप्त करून देणारे, पूज्य आचार्य श्री भारतातील श्रेष्ठ दिगंबर जैन मुनि आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 550 हून अधिक मुनी अध्यात्माच्या वाटेवर आग्रणी आहेत.
आचार्य श्रींचे साहित्यिक योगदान ही उल्लेखनीय असून, त्यांनी हिंदी भाषेत 250 होऊन अधिक ग्रंथांची रचना केली आहे. त्यांच्या महाकाव्य वस्तू महाकाव्याला गोल्डन वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय सत्यार्थ बोध आणि कर्म विभाग या ग्रंथांची ही जागतिक स्तरावर नोंद झालेली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित या मंगल प्रवचनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. पूज्य आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाने धर्म, राष्ट्रपती आणि आदर्श जीवनाच्या तत्त्वांची शिकवण मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.