yuva MAharashtra अणुस्कुरा घाटात बसचे ब्रेक फेल झाले... बस प्रवाशांचे रोखले श्वास, अन्...

अणुस्कुरा घाटात बसचे ब्रेक फेल झाले... बस प्रवाशांचे रोखले श्वास, अन्...

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
राजापूर - दि. १३ जानेवारी २०२५

काळ आला होता पण वेळ आणि नव्हती या म्हणीचा प्रत्यंतर सांगली राजापूर बस मधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांना आज सकाळी आला. केवळ बस चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व बस प्रवासी सुखरूप बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बस चालक एस आर कुर्णे हे आज सकाळी साडेसहा वाजता आपल्या ताब्यातील (एम एच 14, बी टी 4975) बस घेऊन राजापूरच्या दिशेने रवाना झाले. सकाळी साडेदहाच्या दरम्यान बस अणुस्कुरा घाट उतरत असताना बसचे ब्रेक फेल झाले. ही बाब कुर्णे यांच्यासह बस प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर साऱ्यांचेच धाबे दणाणले. प्रवाशांनी श्वास रोखून धरला.


पण बस चालक एस आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या दिशेने वळवली, आणि तेथील कड्याला धडकून बस जागीच थांबली. यानंतर जर बस दरीच्या दिशेने वळली असती तर ? हा प्रश्न साऱ्या बस प्रवाशांच्या मनात आला आणि सर्वांच्याच अंगावर काटा उभारला. याच बसमधून राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पाचल तलाठी सतीश शिंदे हेही प्रवास करीत होते. या प्रसंगानंतर त्यांनी ही 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती.' अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान बस चालक एस. आर. कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.