| सांगली समाचार वृत्त |
मथुरा - दि. २४ डिसेंबर २०२४
भारत हा विविधतेने नटलेला असून रेल्वेचे जाळ अख्खा देशात पसरलंय. भारतातील छोट्या मोठ्या गावापासून शहरांपर्यंत रेल्वेने सर्वांना जोडलंय. भारतात धार्मिक स्थळांपासून ते हिल स्टेशन्सपर्यंत हे जगभरातील पर्यटकांना कायम आकर्षित होतात. या धार्मिक स्थळ आणि हिल स्टेशन्सला जोडणारा दुवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा, जी भारताच्या अर्थव्यवस्थाही मजबूत करतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
भारतात अंदाजे 38000 किमी लांबीच्या ट्रॅकवर दररोज 13000 हून अधिक गाड्या धावतात. रेल्वे प्रवास हा जलद तर असतोच, शिवाय तो स्वस्त देखील असतो. त्यामुळे भारतातील असंख्य लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचं आपली अशी वैशिष्ट्य आहे. असाच एकमेव रेल्वे स्टेशन आहे, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते. त्यासोबत या रेल्वे स्टेशनवर VIP ट्रेनही थांबतात.
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन
देशातील चारही दिशांना जाण्यासाठी तुम्ही ज्या स्थानकावरून ट्रेन पकडू शकता त्या स्थानकाचं नाव तुम्हाला माहीतये का? याला देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन देखील म्हटलं जातं. येथे तुम्हाला 24 तास तुमच्या गंतव्यस्थानावर जाणारी ट्रेन मिळेल.
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशनचे नाव जिथून चारही दिशांना गाड्या उपलब्ध आहेत ते म्हणजे मथुरा जंक्शन. हे उत्तर मध्य रेल्वे झोनमध्ये येते, जे देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनांपैकी एक आहे. येथे तुम्हाला प्रत्येक मार्गासाठी 24 तास ट्रेन उपलब्ध आहे. मथुरा जंक्शनवर एकूण 10 प्लॅटफॉर्म आहेत.
रेल इन्फ्रानुसार, मथुरा जंक्शनवर एकूण 197 गाड्यांचे थांबे आहेत. ज्यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरांतो, सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल, मेमो आणि डेमो गाड्यांचा समावेश आहे. तर अपना सराफ इथून 13 ट्रेन वेगवेगळ्या दिशांसाठी सुरू होतात. 1875 मध्ये पहिल्यांदाच मथुरा जंक्शन येथून गाड्या सुरू झाल्या. जे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे भगवान श्री कृष्णाचे शहर देखील मानलं जातं. होळी आणि जन्माष्टमीच्या वेळी येथे मोठी गर्दी पाहिला मिळते. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून मथुरा जंक्शनमार्गे विशेष गाड्याही चालवल्या जातात.