yuva MAharashtra सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना काँग्रेस सेवा दल पुरस्कार जाहीर !

सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना काँग्रेस सेवा दल पुरस्कार जाहीर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ डिसेंबर २०२
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त व सेवा दलाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना काँग्रेस सेवा दल पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येत असते. यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम माजी खासदार हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनरावजी कदम यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील, जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. श्री यशवंत जी. हप्पे, सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम सिंह सावंत, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी व यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप दादा चाकोते, युवा नेते भारती बँकेचे संचालक जितेश भैय्या कदम, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार, खजिनदार सुभाष तात्या खोत, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ. मालनताई मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. 


दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा जवळपास २७ सन्माननीय व्यक्तीला राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

सदर काँग्रेस सेवादल पुरस्कार विजेते -

१) जीवन गौरव - हुसेन दलवाई, खासदार, भारत सरकार

२) उद्योगभूषण - संभाजीशेठ पाटील, आटपाडी

३) उद्योगभूषण - प्रा. मोहन व्हनखंडे सर, मिरज.

४) क्रीडा भूषण - सचिन सर्जेराव खिलारी, आटपाडी

५) क्रीडारत्न - वीर सचिन ढोले, समडोळी

६) आदर्श शिक्षिका - दिपाली अरुण मगर, कोगनोळी

७) आदर्श शिक्षिका - सोनम किर्तीराज वंजाळे, बागणी

८) आदर्श शिक्षिक - वैभव मोहन सुर्यगंध, शिरटे, ता. वाळवा.

१) कलाभूषण - शाहीर मोहन गणपती यादव, सांगली.

१०) कलाभूषण - सौ. अंजली भिडे, सांगली

११) कलारत्न - विजयकुमार भिमराव खाडे, कवलापूर

१२) कलारत्न - श्रीमती सविता हणमंत गावडे, येळावी.

१३) कलारत्न - सौ. अपर्णा अमोल गोसावी, सांगली

१४) आदर्श धन्वंतरी - डॉ. अमोल अशोक कोरे

१५) आदर्श धन्वंतरी - डॉ. नंदकुमार तानाजी मोरे, अग्रणधुळगांव.-

१६) आदर्श आरोग्य सेवा - श्रीमती पद्मा अमोल येवलेकर, सांगली.

१७) समाजभूषण - राकेश हणमंत दोड्डण्णावर, इनामधामणी.

१८) समाजभूषण - सौ. सविता चंद्रकांत काकडे, शिवणी, कडेगांव.

११) समाजभूषण - अजित करांडे, शाळगांव, ता. कडेगांव.

२०) समाजरत्न - मा. श्री. चंद्रकांत भिमराव जाधव, आगळगाव.

२१) समाजरत्न - वर्षाराणी रावसो चव्हाण, रांजणी

२२) समाजरत्न - स्वरुपा महावीर चव्हाण, समडोळी

२३) आदर्श रक्तदाता - राजकुमार बापूसो ढोले, समडोळी.

२४) साहित्यभूषण - दिनकर विष्णू काकडे, मिरज.

२५) साहित्यरत्न - डॉ. मोहन गोविंद लोंढे, कवठेमहांकाळ.

२६) प्रतिक्षा भगवान जाधव, पोसवाडी ता खानापूर 

२७) पौर्णिमा धनाजी जगताप, कवठेमहेकाळ

सदर पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी दु. १-०० वा. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, गारपीर चौक, सिव्हील हॉस्पिटल जवळ पिछाडीस, सांगली येथे होणार आहे.