| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ डिसेंबर २०२४
छ. शिवाजी मंडईमध्ये भाजी खरेदीला येणारे नागरिक सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आपली दुचाकी वाहने पार्किंग करीत होते. एका बाजूला दुचाकी पार्किंग तर दुसऱ्या बाजूला भाजी विक्रेते. यामुळे येथून येणार जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होत होता. बस ट्रक चालकांना तर अजगराच्या वेगाने वाहन न्यावे लागायचे. एखाद्या पादचाऱ्याला धक्का लागलाच तर सारा दोष वाहन चालकाचा मानला जायचा. यातून मोठ्या दुर्घटनेचेही शक्यता होती. आणि झाले ही तसेच...
या अस्ताव्यस्त अतिक्रमणाचा धोका एका निरपराध पादचाऱ्यास झाला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. निद्रिस्त असलेली
अतिक्रमण विभाग व पोलीस यंत्रणा जागी झाली. छ. शिवाजी मंडई समोर बसलेल्या भाजीविक्रेतांना कायमस्वरूपी या ठिकाणी बसण्यास मनाई करण्यात आली.
पण "छ. शिवाजी मंडई परिसरातील भाजी विक्रेते गेले, दुचाकी पार्किंग आले, वाहतूक पोलिस अन् महापालिका अतिक्रमण विभाग सुस्तच राहिले !" असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाहने पार्क करू नयेत म्हणून एक बॅरिटेक उभारण्यात येतात. काही महाभाग त्याच्यापुढे आपली दुचाकी किंवा चार चाकी अगदी रिक्षा आहे उभ्या करतात. तर ज्या ठिकाणी भाजी विक्रेते बसले असायचे, त्या ठिकाणी दुचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे पार्किंग मुळे नागरिकांना होणाऱ्या धोक्याचा मूळ प्रश्न तसाच कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात यावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.