yuva MAharashtra सांगली, मिरज व कुपवाड महापालिका थकीत घरपट्टीबाबत ॲक्शन मोडवर, कटू कारवाई टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन !

सांगली, मिरज व कुपवाड महापालिका थकीत घरपट्टीबाबत ॲक्शन मोडवर, कटू कारवाई टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ डिसेंबर २०२
सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर थेट सिलची कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकानगाळे 18 लाखाच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली.


आतापर्यंत 5 लाखाच्या वरील थकबाकी असणाऱ्या 20 हजार मालमत्ता धारकांना महापालिकेने वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत. महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला, कार्यकारी अधिकारी गणी सय्यद, वॉरंट. ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

व्हिडिओ समाविष्ट 

दरम्यान, थकीत घरपट्टी धारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून आपल्यावरील कारवाई टाळावी असे आवाहन कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी केले आहे.