yuva MAharashtra एका फार्मासिस्टला विधानसभेत पाठवायचं... सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व फार्मासिस्टचा निर्धार !

एका फार्मासिस्टला विधानसभेत पाठवायचं... सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व फार्मासिस्टचा निर्धार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आपलेच फार्मासिस्ट बंधू पृथ्वीराज गुलाबराव पाटील हे काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत पृथ्वीराजबाबा पाटील हे यापूर्वी आपणास भेटले. त्यावेळी फार्मसी व्यवसायातील अडचणी, समस्या मोकळेपणानी आपण मांडल्या. त्याची नोंदही पृथ्वीराज पाटील यांनी घेतली आहे. त्याचबरोबर भविष्यात सांगली कशी असावी याबाबत आपण मौलिक सूचनाही केल्या. ऑनलाईन फार्मसीमुळे आपला व्यवसाय धोक्यात आला आहे याची आपल्याला पुरेपूर कल्पना आहे.फार्मसी संबंधित असलेले कांही जाचक कायदे दुरुस्त करणे आवश्यक आहेत. महापुरामळे आपली कांही दुकाने पूरग्रस्त होऊन नुकसान होत आहे. आपल्या समस्या विधानसभेत मांडून आवाज उठविण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत आयोजित फार्मासिस्ट बैठकीत सांगितले आहे. 

दि.२० नोव्हेंबर, २०२४ रोजी स. ७.००ते सायं.६.०० या वेळेत सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आपण न चुकता पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनाच मतदान करावे. 

पाच वर्षे ते सांगलीसाठी राबलेत. आता पुढची पाच वर्षे त्यांना आमदार म्हणून संधी दिल्यास आपल्या व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी व सांगलीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ते झटतील. आपले एक मत आपल्याच फार्मासिस्ट बंधूला आमदार म्हणून विधानसभेत पाठवू शकते.  

पृथ्वीराज पाटील यांच्या क्र. २ वर असलेल्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.