yuva MAharashtra राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील

राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२
राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

रेठरे धरण (ता. वाळवा) येथे महाविकास आघाडीचे शिराळा मतदारसंघातील उमेदवार नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, राज्यातील राजकारण सध्या खालच्या थराला गेले आहे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. येथे हुकूमशाही चालत नाही. विकास करावा लागतो. यासाठीच आम्हाला साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.


आ. नाईक म्हणाले, की वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई तलावातून पहिल्यांदा वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आणले. हा विभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. २ हजार २७५ कोटी रुपयांची विकासकामे राबवून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. या केलेल्या कामाच्या जोरावर मतदान मागतोय. विकास कामांना गती देण्यासाठी या वेळी संधी देण्याची मागणी करत आहे.