yuva MAharashtra हांडे पाटील तालमीचा सुधीरदादा गाडगीळ यांना पाठिंबा !

हांडे पाटील तालमीचा सुधीरदादा गाडगीळ यांना पाठिंबा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ नोव्हेंबर २०२
मी स्वतः बॉक्सिंग खेळलो आहे. त्यामुळे मला खेळाबद्दल आणि खेळाडूबद्दल खूप आपुलकी आणि आस्था आहे. सांगलीतील ज्योतीरामदादा कुस्ती आखाडा नव्या स्वरूपात उभा राहत आहे. प्रत्येक प्रभागात आणि मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज क्रीडांगणे उभी राहत आहेत, राहणार आहेत. सांगलीतील मल्लविद्या टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. किंबहुना कोणताही खेळ खेळणाऱ्यांना माझी यापुढेही सातत्याने मदत राहील. सांगली ही क्रीडानगरी आहे. येथील कुस्ती, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट यासह प्रत्येक खेळाच्या विकासासाठी मी मदत केली आहे आणि यापुढेही करणार आहे. सांगलीचे नाव क्रीडा क्षेत्रात संपूर्ण जगात मोठे झाले पाहिजे. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.


गावभागातील सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या हांडेपाटील तालमीचे प्रमुख सुजित हांडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पैलवान, वस्ताद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी आणि संगीताच्या तालावर केक कापून हांडे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सुधीरदादा यांचा यावेळी तालमीतर्फे आणि उपस्थित सर्व पैलवानातर्फे तर्फे सत्कार करण्यात आला.

सुजित हांडे पाटील तसेच या तालमीचे वस्ताद ज्योतीराम वाझे यांनी सुधीरदादांनी कुस्ती कलेच्या तसेच अन्य खेळांच्या विकासासाठी केलेल्या मदतीची यावेळी माहिती दिली. भाजप नेते अतुल माने यांनी सुधीरदादांनी प्रत्येक प्रभागात क्रीडांगणाच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी वस्ताद अजित शिंदे, वस्ताद शशिकांत कुंभार, वस्ताद शहाजी पवार, पैलवान अमोल खंबाळे, उदय भडेकर, रवी बाबर, सौरभ शिंदे, पैलवान गुलाब पाटील, श्री शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार, संतोष देवळेकर आदि उपस्थित होते.