yuva MAharashtra आदर्श आचारसंहितेचा भंग, राज्यात ५०० कोटींची मालमत्ता जप्त !

आदर्श आचारसंहितेचा भंग, राज्यात ५०० कोटींची मालमत्ता जप्त !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ नोव्हेंबर २०२
१५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १५ ऑक्टोबरला आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. निवडणूक २० नोव्हेंबरला होत असून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून संपूर्ण राज्यभर स्थिर आणि भरारी सर्वेक्षण अशी ६ पथके तैनात करण्यात आली आहेत. पथकांमार्फत केल्या गेलेल्या कारवाईत संशयास्पद वस्तू जप्त केल्या गेल्या. आतापर्यंत ५०० कोटी रुपयांपेक्षा बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

राज्यात ६ हजार पथके निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचारसंहितेचे पालन केले जात असताना अनेक ठिकाणी तपासणीवरून निवडणूक अधिकारी आणि राज्यातील प्रमुख नेते यांचे खटके उडत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची वणी येथे तपासणी केल्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेचा झाला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर दिसू लागले आहेत. निवडणूक काळात कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये, याकरिता निवडणूक आयोगाकडून केली गेलेली तरतूद आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत , ही असून, हजार या जास्त आहेत. स्थिर आणि भरारी अशा दोन प्रकारची सर्वेक्षण पथके प्रत्येक मतदारसंघांमध्ये तैनात आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण ६ हजार पथके आणि १९ अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.


कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाहीः उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक तपास यंत्रणांवर अनेक आरोप केले. केवळ विरोधकांच्या बॅगांचीच तपासणी केली जाते आणि सत्ताधारी नेत्यांच्या बॅगांमधून करोडो रुपयांची ने-आणग केली जाते, पण त्यांच्या बॅगा तपासल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.