yuva MAharashtra लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, अंडरकरंटने विरोधक आडवे झाले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल : अजित पवार

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, अंडरकरंटने विरोधक आडवे झाले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल : अजित पवार


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ नोव्हेंबर २०२
महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल माध्यमांना संबोधित केलं. सर्वजण आपापले अंदाज व्यक्त करत होते. काल वेगवेगळ्या चॅनेलला पाहत होतो. बाकीच्यांचं गाड्या फिरवणं, इकडं जाणं तिकडं जाणं सुरु होतं. आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ असं वाटत होतं. मात्र, कालचं सर्व पाहिल्यावर आम्ही खाली जातो की काय असं वाटत होतं. परंतु, महाराष्ट्रातील जनतेनं विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं यश मिळवून दिलं आहे. त्याबद्दल महायुतीच्या वतीनं जनतेचं आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या विजयाचं श्रेय माझी लाडकी बहीण योजनेला दिलं.

कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असं समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. महाराष्ट्रात अपयश आलं होतं, ते अपयश आम्ही मान्य केलं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजर झाली. अंडरकरंट असा बहिणींनी दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, हे माझं स्पष्ट मत आहे.


आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार आलं आहे. मी राजकारणात आल्यापासून 222 आणि तसं 225 महायुतीला जागा मिळाल्या. एवढं कधी पाहिलं नाही. या यशानं हुरळून देखील जाणार नाही. जसे जसे आकडे पाहत होतो, तेव्हा आर्थिक गोष्टी समोर येत होत्या. आर्थिक शिस्त समोर आणू, आम्हाला याचा अनुभव आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्याचा आधार आहे, असं अजित पवार म्हणाले.

विरोधक निवडणूक टीका करतात बॅलट पेपरनं निवडणूक घ्यायला पाहिजे होती मग लोकसभा निवडणूक देखील बॅलट पेपरवर घ्यायला हवी होती. झारखंड आमच्या हातून गेलं, आम्ही काय म्हणतोय का? असा सवाल अजित पवार यांनी केला. महाराष्ट्रातील सर्व विभागातून आम्हाला मतदान झालं आहे. लोकसभेला मराठवाड्यात केवळ एक जागा मिळाली होती, असं शरद पवार म्हणाले. आमच्या महायुतीवरील जबाबदारी वाढलेली आहे. जनतेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. पाच वर्ष एकोप्यानं काम करेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.