yuva MAharashtra सुधीरदादांची हॅट्रिक... कार्यसम्राट असलेबद्दलची जनतेतूनच पावती !

सुधीरदादांची हॅट्रिक... कार्यसम्राट असलेबद्दलची जनतेतूनच पावती !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ नोव्हेंबर २०२
महायुती... तथा भाजपचे उमेदवार नवनिर्वाचित आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ यांनी काल विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली... ही त्यांच्या कार्यसम्राट असल्याचीच पावती ठरली....

वास्तविक विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी यापुढे आपण किंवा आपल्या घरातील कोणीही, कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु भाजपच्या सर्वेमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुधीरदादा गाडगीळ असतील, तरच येथे महायुती तथा भाजपाला विजय मिळू शकतो असा अहवाल प्राप्त झाला होता.

सुधीरदादांशिवाय अन्य कोणी उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत भाजप तर्फे जाहीर झाला असता, तर संभाव्य बंडखोरी रोखण्यात पक्षाला अपयश येण्याचे अधिक शक्यता होती. आणि म्हणूनच पक्षाने सुधीरदादांना निवडणुकीत उतरण्याचा 'आदेश' दिला. तो शिरसावंद्य म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

इकडे महाआघाडीत काँग्रेस तर्फे बंडखोरी करून श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सुधीरदादांची हॅट्रिक पक्की झाली. परंतु सुधीरदादांच्या विजयाचे हे एकमेव कारण नव्हते. गेला दहा वर्षात त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या निधीतून मतदार संघात जो विकासाचा डोंगर उभा केला, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि नागरिकांशी राखलेला सुसंवाद हेही तितकेच महत्त्वाचे ठरले. आणि म्हणूनच विरोधकांकडून त्यांच्यावर केलेल्या आरोपाचा धुरळा याच्या गुलालात विरून गेला.

सुधीरदादांवर विरोधकांकडून बेछूट आरोप झाले. परंतु अत्यंत संयमीपणे त्याला उत्तर देऊन मतदारांच्या पसंतीस सुधीरदादा उतरले, आणि मतदाराने या पसंतीस मतदान यंत्रातून मोहर उमटवली. परंतु आता सुधीरदादांची जबाबदारी वाढली आहे. आगामी पाच वर्षात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करून, "कार्यसम्राट" ही पदवी पुन्हा एकदा सिद्ध करण्याची आवश्यकता आहे.