| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ नोव्हेंबर २०२४
ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या भक्कम पाठबळामुळेच गेल्या दहा वर्षात आपण अंकली गावाचा कायापालट करू शकलो. यापुढेही अंकली गाव विकासात अग्रेसर ठेवू, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. अंकली येथे भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली. त्यावेळी नागरिकांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते.माजी सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, सुनील पाटील, किरण कुंभार यांनी आयोजित केलेल्या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.
सुधीर गाडगीळ म्हणाले, आजपर्यंत मोठा निधी आपण अंकली गावाला दिला आहे. ह्या निधीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अंकली गावाचा विकासकामांच्या माध्यमातून जो कायापालट झाला आहे त्याबद्दल मला समाधान वाटते.
कुंभार गल्ली, सोसायटी परिसर, जैन बस्ती रोड, ग्रामपंचायत परिसर,सांगली कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, मळीभाग, सिद्धार्थ परिसर या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली. जैन बस्ती तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
उपसरपंच माधुरी परिट, सुरज कोळी, प्रमोद खवाटे, माजी सभापती त्रिशला खवाटे, शुभम उगारे, सम्मेद चौगुले, नितीन पाटील, अनिल चौगुले, पंकज पाटील, अरुण नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.