| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ नोव्हेंबर २०२४
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बोलबाला असलेल्या संजयनगरात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला. फटाक्याच्या आतषबाजीने पदयात्रेत नागरिकांचा सहभाग अद्भुत होता... पृथ्वीराजबाबा आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो या घोषणाबाजीत संजयनगर दणाणले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'महायुती शासनाने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला आहे. एका हाताने पंधराशे दिले आणि दुसऱ्या हाताने तेल, धान्ये, कडधान्ये यांचे दर वाढवून व महिला अत्याचाराचे समर्थन करुन लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. महायुती ही लुटारुंची टोळी आहे. असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
आमदार फोडून अनितीच्या मार्गाने सत्ता काबिज करणाऱ्या महायुतीकडे खोक्यानं पैसा आहे परंतु जनतेच्या हितासाठी शैक्षणिक खर्चासाठी पैसा नाही. शिक्षक भरती केली तर पगार द्यावा लागतो. शाळा काॅलेज मध्ये आपल्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत. असे सांगून ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत यांनी आमच्या बहुजन समाजातील लेकरांचे कधीही भरुन न येणारे नुकसान केले आहे. याचा जाब विचारण्यासाठी २० नोव्हेंबरला हाताच्या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
संजयनगरात पदयात्रा, गृहभेटी व गृहबैठकीत ते बोलत होते.महाआघाडी सरकारच येणार आहे आणि हे जनतेनेच ठरवले आहे. आमची सत्ता येताच लाडक्या बहिणीला दरमहा रु. ३००० देणार, महिलांना एसटी प्रवास मोफत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, जुनी पेन्शन योजना लागू करणार.. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रु. ४००० भत्ता देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संजयनगर हा कष्टकरी कामगार वंचित लोकांची वस्ती असलेला भाग. बेरोजगारी हा या भागातील तरुणांचा ज्वलंत प्रश्न. या भागात गेल्या दहा वर्षांत आमदार फिरकलेच नाहीत तर त्यांना जनतेच्या व्यथा कशा कळणार? हा प्रश्न आता जनताच विचारत आहे. सांगलीत गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे रोजगार संधी नाहीच. सांगलीच्या समस्यांकडे विद्यमान आमदारांनी कधीच गांभीर्याने पाहिले नाही. ते मतदार संघात फिरतच नाहीत त्यामुळे त्यांचा जनसंपर्क झालाच नाही. आम्ही नागरिकांना कायम भेटत असतो त्यावेळी आमदारांची अकार्यक्षमता जनतेकडूनच ऐकायला मिळाली आहे. पाच वर्षे काम केले आहे आता आमदार म्हणून पाच वर्षे मलाश द्या. असेही ते म्हणाले. '
यावेळी शंकर तुपे, महेश मासाळ, चंदनदादा चव्हाण, विष्णू कुटे, अमर व जगन्नाथ अहीर, बबलू अलमेल, महेश सावंत, मोहन वाघमारे, यासीन शेख, पार्थ जेडगे,रोहीत सकटे, सद्दाम शेख, सिद्रामप्पा पेडणेकर, जकी गिरगाडे, साईराज जेडगे, आयुब मुल्ला, दादा चंदनशिवे, प्रणव कांबळे, सादीक मलबारे, पृथ्वीराज व यशराज चव्हाण, आशुतोष सावंत, सुखदेव कांबळे आणि संजयनगरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.