yuva MAharashtra सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण, शरद पवार की देवेंद्र फडणवीस ?

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण, शरद पवार की देवेंद्र फडणवीस ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२
यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये प्रमुख तीन-तीन राजकीय पक्ष आहेत आणि इतर काही लहान पक्षही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल दिसून आले. गेल्या पाच वर्षात कोणाच्या हातून पक्ष गेला तर कोणाच्या हातून आमदार निसटले; त्यामुळे यंदा लोक कोणाला मतदान करणार, कोणाच्या हातात राज्याची सत्ता येणार, कोणाच्या पदरी मुख्यमंत्रिपद येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच कारणाने ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता नेता सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे? सोशल मीडियावर कोणाचे सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

शरद पवार

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. १९९९ साली ते काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. पण, अजित पवार यांनी २०२३ मध्ये बंडखोरी केली आणि त्यांचा पक्ष फुटला. आता अजित पवार यांच्याकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर शरद पवार यांच्या पक्षाचे नाव "राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष" असे आहे.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ९ लाख १३ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ८ लाख ९० हजार फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – २९ लाख फॉलोअर्स

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली. त्या वेळी ते महाराष्ट्रातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ९१ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – २१ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – ५९ लाख फॉलोअर्स

उद्धव ठाकरे 

२०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले होते, पण हे मुख्यमंत्रिपद फार काळ टिकले नाही. २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले, तसेच मुख्यमंत्री पदाचासुद्धा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आहे, तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ४ लाख ८६ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ३ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १६ लाख फॉलोअर्स

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड पुकारून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं आणि सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मते, त्यांनी बंड केलेले नसून उठाव केलेला आहे आणि ते आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असल्याचे म्हणतात.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ३८ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – २८ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १० लाख फॉलोअर्स

राज ठाकरे 

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेनेपासून वेगळे होत त्यांनी स्वत:चा एक वेगळा पक्ष स्थापन केला. त्यांची भाषणे नेहमी चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांच्या पक्षाचा महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणत्याही गटात समावेश नाही.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ११ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – राज ठाकरे यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट नाही, पण त्यांचे फॅन पेज भरपूर आहे, ज्यावर त्यांना लाखो लोक फॉलो करतात.
एक्स (ट्विटर) – १८ लाख फॉलोअर्स

अजित पवार 

अजित पवार हे तीन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते मानले जातात. अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपा आणि शिवसेनेबरोबर युती केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ८ लाख २० हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ११ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १६ लाख फॉलोअर्स

नाना पटोले !

नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय ते विधानसभेत विरोधी पक्षनेतेसुद्धा होते. मे २०१४ मध्ये त्यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ३ लाख ७ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ९५ हजार फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – ३ लाख ७६ हजार तीनशे फॉलोअर्स

निवडणुका