| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२४
पोलिसांच्या गणवेशाचा रुबाब वेगळाच असतो. पोलीस कर्मचारी जेव्हा गणवेश घालतात तेव्हा त्यांची पर्सनॅलिटी आणखी उठून दिसते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करत असतात. तुम्हीही कधीतरी पोलिसांना पाहिले असेल किंवा त्यांना भेटले असेल, पण तुम्ही कधी पोलिसांचा गणवेश काळजीपूर्वक पाहिला आहे का ? पोलिसांच्या खांद्यावर दोरी असते हे तुम्ही पाहिलं असेल, पण ती दोरी पोलिसांच्या गणवेशाला का जोडली जाते आणि त्याचे काम काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला पोलिसांच्या गणवेशात ही दोरी का लावली जाते आणि त्याचे काम काय आहे ते सांगणार आहोत.
पोलिसांच्या वर्दीला जोडलेली ही दोरी अशीच जोडलेली नाही. त्याचे देखील एक काम आहे. पोलिसांच्या वर्दीला जोडलेल्या या दोरीला काय म्हणतात माहीत आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की पोलिसांच्या गणवेशाला जोडलेल्या या दोरीला लैनयार्ड" (Lanyard) म्हणतात.
या दोरीकडे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ही दोरी पोलिसांच्या खिशात असते. कारण या दोरीला एक शिट्टी बांधलेली असते, जी पोलिसांच्या खिशात असते. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस ही शिट्टी वापरतात. जेव्हा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवावे लागते किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्या सहकारी पोलिसांना संदेश द्यावा लागतो तेव्हा ते ही शिट्टी वापरतात.