yuva MAharashtra शांतता सुव्यवस्था राखणे कर्तव्यच! निवडणुका शांततेत पार पाडणे सर्वांची जबाबदारी : पोलीस निरीक्षक मोरे.

शांतता सुव्यवस्था राखणे कर्तव्यच! निवडणुका शांततेत पार पाडणे सर्वांची जबाबदारी : पोलीस निरीक्षक मोरे.


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२
सांगली येथील माहिती अधिकार अभियानाच्या अंतर्गत विविध उत्सव, सण, आंदोलने, शांततेत पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात, जबाबदारी आणि कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले की, समाजात शांतता सुव्यवस्था राहिल्यासच समाजाची प्रगती होईल. शांतता सुव्यवस्था राखणे हे पोलीस म्हणून आमचे कर्तव्यच आहे. ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो. तसेच येणारी निवडणूक सुद्धा शांततेत पार पडेल. असा आत्मविश्वास शिष्टमंडळाशी बोलताना पोलीस निरीक्षक मोरे यांनी व्यक्त केले. 


यावेळी शाहीन शेख, प्रमोद माळी, प्रकाश मदरी, सचिन कारंडे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.