| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२४
विधानसभा मतदारसंघातील महायुती तथा भाजपचे उमेदवार, विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सांगली शहरात प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सर्वच भागातून त्यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नुकतीच त्यांनी प्रभाग क्रमांक एक मधील अहिल्यानगर, प्रकाशनगर तसेच वसंतदादा शेतकरी साखर कारखाना परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गेल्या दहा वर्षात आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेल्या विकास कामामुळे समाधान व्यक्त करीत या परिसरातील नागरिकांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने सुधीर दादांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून घर टू घर प्रचार करू असा शब्द दिला. यावेळी बाळासाहेब कांबळे, विद्या उत्तम मोरे, शाहिद मुजावर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिसरातील नागरिकांनी सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत व विजयाच्या घोषणा देऊन जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक एक साठी सुधीरदादांनी केलेल्या कामाचे सविस्तर माहिती दिली व होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ. सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, या परिसराचा मला सातत्याने पाठिंबा मिळालेला आहे यामुळेच या भागाच्या विकासासाठी मी नेहमीच पाठपुरावा करीत आलो आहे. यापुढेही या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. शहरातील एक आदर्श परिसर म्हणूनही हा भाग ओळखला जाईल असे काम या ठिकाणी उभे केले जाईल, असे यावेळी बोलताना आ. गाडगीळ यांनी सांगितले.
यावेळी घरोघरी वाटपही करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कासम मकानदार, मनोज पाटील, सुहास कल्ले, नवनाथ खिलारे, विलास काटकर, यांच्यासह कोमल चव्हाण, शोभाताई बिक्कड, अरुणा वाघ, राणी पाटील इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.