yuva MAharashtra भारतातील पहिली स्मार्ट बिलिंग सुविधा सांगलीतील चंदूकाका सराफ ज्वेल्स येथे कार्यान्वित !

भारतातील पहिली स्मार्ट बिलिंग सुविधा सांगलीतील चंदूकाका सराफ ज्वेल्स येथे कार्यान्वित !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांनी संपूर्ण ज्वेलरी क्षेत्रात मानाचे स्थान संपादन केलेले चंदूकाका सराफ ज्वेल्स्, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण सेवांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. याचेच एक उदाहरण म्हणजे ज्वेलरी क्षेत्रातील बिलिंग सिस्टीममध्ये क्रांतीकारक ठरणारा बदल आणि ग्राहकांना अतिशय सुलभतेने पेमेंट करून बिलिंगच्या रांगेमधून सुटका देणाऱ्या अभूतपूर्व पर्यायाचा स्वीकार. अर्थात स्मार्ट बिलिंग सुविधेचा शुभारंभ नुकताच चंदुकाका सराफ ज्वेलस् यांनी केला आहे. यामध्ये ग्राहकांना व्हाट्सअप बिलिंग व सेल्फ बिलिंग या सुविधा देण्यात आले आहेत.

अशा प्रकारची सेवा सादर करणारी चंदूकाका सराफ ज्वेल्स् ही  भारतातील पहिली सुवर्णपेढी ठरली आहे. शासनाच्या डिजिटल इंडिया या संकल्पने अंतर्गत ऑनलाइन पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी, चंदूकाका सराफ ज्वेल्स् यांनी ही सुविधा प्रस्तुत केली आहे. या सोयीबद्दल ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


स्मार्ट बिलिंग या सुविधे अंतर्गत ग्राहकांनी निवडलेल्या दागिन्यांच्या इस्टिमेट डिलिव्हरी नोटमार्फत पेमेंट करून, बिलिंगच्या रांगेमध्ये न थांबता त्यांच्या खरेदीचे पेमेंट करू शकतील. आणि तात्काळ आपला निवडलेला दागिना अगदी कमी वेळेत आनंदाने घरी घेऊन जाऊ शकतील. या स्मार्ट बिलिंग सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून दिवाळीनिमित्त आपले आवडते दागिने झटपट खरेदी करण्यासाठी आमच्या नजीकच्या सुवर्ण दालनाला भेट द्या, असे आवाहन चंदूकाका सराफ ज्वेल्स् चे संचालक श्री. सिद्धार्थ शहा यांनी केले आहे. सांगली पाठोपाठ सदरची सुविधा सध्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सर्व शाखांमध्ये उपलब्ध केली आहे.