Sangli Samachar

The Janshakti News

मोटार अपघातात सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता वाचले थोडक्यात, पण डोक्याला गंभीर दुखापत, दवाखान्यात केले दाखल !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑक्टोबर २०२४
सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सांगली शहरातील गव्हर्मेंट कॉलनीत गुप्ता यांची शासकीय गाडी एका खांब्याला धडकली असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना उपचारासाठी मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांनी तातडीने ब्रेक मारला आणि गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची गाडी खांब्याला धडकली. या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली. संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी शुभम गुप्ता यांना गाडीतून बाहेर काढलं. तसेच अपघातग्रस्त गाडी बाजूला केली. त्या गाडीला रस्त्याच्या कडेला बाजूला लावण्यात आलं आणि शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.