Sangli Samachar

The Janshakti News

'रात्रीस खेळ चाले !' महाराष्ट्रातील नवा राजकीय भूकंप, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचा आरोप !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई   - दि. २ ऑक्टोबर २०२४
महाआघाडीत उद्धव ठाकरे यांना त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये 'मुख्यमंत्री पदाचा चेहरा' म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून नकार दिल्यानंतर, ठाकरे गटाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार झाल्याने उद्धव ठाकरे व त्यांचे नेते राज असल्याची चर्चा ऐकू येत होती. यातूनच ठाकरे गट महाआघाडीतून बाहेर पडणार असल्याची वंदता माध्यमातून मांडले गेले. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करुनही आगामी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित न मिळाल्याने ठाकरे गटात चलवबचल सुरू होती. अशातच ठाकरे आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीच्या आरोपाने राजकीय वातावरण तापले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रयोग होते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या खळबळजनक दावा केल्याने राज्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्री एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. 

तब्बल दोन तासाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या खलबतानंतर सहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीत पोहोचले. या ठिकाणी त्यांनी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्याशी चर्चा केल्याचा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी करून, दिल्ली जाताना सोबत कोण कोण होते ? तेथे कोणाच्या गाठीभेटी झाल्या हे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी जाहीर करावे असे आव्हानच मोकळे यांनी दिले आहे.


यावेळी बोलताना सिद्धार्थ मोकळे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे हेही आरक्षण विरोधी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. हगामी निवडणुकीपूर्वी आणखी एक राजकीय भूकंप जनतेस पहावयास मिळणार आहे. आणि म्हणूनच आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्हाला मिळालेली माहिती जनतेसमोर ठेवत असल्याचे सिद्धार्थ यांनी म्हटले आहे
.

2019 ची विधानसभा निवडणूक भाजपा आणि एकत्रित शिवसेनेने लढवली होती. त्यानंतर महायुती सत्तारूढही झाली होती. परंतु मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने उद्धव ठाकरे यांनी महायुतीतून बाहेर पडून महाआघाडीशी संसार थाटला. यावेळी पहिला राजकीय भूकंप झाला. परंतु तदनंतर एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना बरोबर घेऊन पुन्हा भाजपाशी संधान बांधून मुख्यमंत्रीपदावर झाले, राजकीय भूकंप झाला. तिसरा भूकंप झाला तो, शरद काकांशी मतभेद झालेले अजित दादा महायुतीत सहभागी झाले तेव्हा. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जनतेला राजकीय भूकंप पहावयास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.