Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृती दिनानिमित्त परेड संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
सांगली येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारक येथे पोलीस स्मृती दिनानिमित्त परेड संपन्न झाली. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लढाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्व तयारीनिशी हल्ला केला होता. त्या दहा शूरवीरांनी शत्रूशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतिद म्हणून बाळाला जातो.

या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहिण्यात येते दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते दिनांक १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशातील सर्व राज्यातील एकूण २१४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले. या सर्व पोलीस होतात यांना काल दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी देशवासीयांतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.


सदर परेडचे नेतृत्व श्री. बाळासाहेब आलदर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले. सदर परडमध्ये ३० पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पोलीस पथक सहभागी झाले होते. सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये तीन वेळा फायर करून शहीरांना मानवंदना दिली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संदीप घुगे हे उपस्थित होते. तसेच श्रीमती रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमलायम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री प्रेमी गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, श्री. दादासो चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार होमगार्ड प्रश्नार्थक व मंत्रालयीन हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी (सेनि) यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये शहिदांच्या नावाचे वाचन श्रीमती कविता नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे, श्रीमती तेजस्विनी पाटील पोलीस उपनिरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे व श्रीमती सपना अडसूळ पोलीस उपनिरीक्षक नीरज शहर पोलीस ठाणे यांनी केले.