yuva MAharashtra विधानसभेसाठी नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्व बदलण्यात काँग्रेस पक्षाला धोकादायक - प्रवक्ते संतोष पाटील

विधानसभेसाठी नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्व बदलण्यात काँग्रेस पक्षाला धोकादायक - प्रवक्ते संतोष पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
2024 च्या लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या व त्यांच्या मुळेच लोकसभेला महाराष्ट्रात घवघवीत यश प्राप्त झाले. याचीच भीती विरोधी पक्षाने घेतली आहे. त्यामुळे इतर विरोधी पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचं नेतृत्व बदलण्यासाठीच घटक पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांनाच विरोधी पक्षाने प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्व बदलण्यासाठी सुपारी दिली आहे असे वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष काँग्रेस पक्षाला दाबत आहेत असं वाटते. 

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य जनतेचा जनाधर आहे. भविष्यकाळात विधानसभेला काँग्रेस पक्षालाच जास्त जागा मिळतील व काँग्रेस पक्ष एक नंबरला येऊन मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, याची भीती काही विरोधी पक्षातील नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पाडण्याचं काहीजणांचा मनसुबा आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षातच फूट पाडून प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्व बदलून भविष्यकाळात काँग्रेसला यश मिळू नये, अशा हालचाली राज्यात चालू आहेत. 


परंतु आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ यांचे नेतृत्व बदलून काहीजण काँग्रेस पक्षाला धोका निर्माण करत आहेत व याचा फटका येणाऱ्या विधानसभेला भविष्यकाळात काँग्रेस पक्षालाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवावी तरच काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त होईल अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.