| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याचवेळी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळायला हवी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे धुरा ज्यांच्या हाती आहे, ते आ.डॉ. विश्वजीत कदम आणि खा. विशाल पाटील यांच्यासमोर संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दोघांपैकी कोणीही बंडखोरी केली तर त्याचा प्रत्यक्ष फायदा भाजपा उमेदवाराला होणार आहे. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशालदादा पाटील यांनी जयश्री ताईंना ट्रिपल धमाका ऑफर देऊ केली आहे. विधान परिषद निवडणुकीत आमदारकी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद आणि आगामी महापालिका निवडणुकीत नेतृत्वपद असे आश्वासन या नेत्यांनी दिले आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला तसेच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून शब्द दिला जाईल असेही सांगण्यात आले आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात एका सर्वेनुसार जयश्रीताई पाटील यांच्यापेक्षा पृथ्वीराजबाबा पाटील यांना मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरील सर्व नेते जयश्रीताई ऐवजी पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत. परंतु जयश्रीताईनी मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला थांबण्याचा आदेश दिल्याने, आपण कार्यकर्त्यांचा आग्रह असूनही माघार घेतली होती. त्यामुळे यावेळी आपल्याला संधी मिळायला हवे अशी भूमिका मांडली आहे.
जर बंडखोरी झाली तर त्याचा थेट फायदा भाजप उमेदवाराला होणार आहे. महाराष्ट्रातील महायुती विरोधातील कल पाहता, महाआघाडीचे सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील 288 जागावर, मेरिटने उमेदवारी देऊन काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणायचा असा चंग काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला आहे.
आणि म्हणूनच चांगले विधानसभा मतदारसंघातील संभाव्य बंडू कोरे टाळण्यासाठी जयश्रीताईंना निवडणूक लढवण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यदाकदाचित बंडखोरी झालीच, तर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मागे पक्षाचे संपूर्ण ताकत उभे करायचे असाही निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. सूत्रांच्या विश्वसनीय माहितीनुसार या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे पृथ्वीराजबाबा पाटील यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि मतदानाची तारीख यामध्ये प्रचारासाठी हवा घ्या 15 ते 20 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य बंडखोरी टाळून तोडगा काढण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करीत आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यताही वरतून येत आहे.