| सांगली समाचार वृत्त |
आटपाडी - दि. १ ऑक्टोबर २०२४
माहिती सार्वजनिक करायला काही लोकांचा विरोध आहे. माहिती अधिकार कायदा जनतेचा अंकुश ठेवणारा कायदा असून, आत्तापर्यंतचे सर्व कायदे हे जनतेवर अंकुश ठेवणारे कायदे होते. प्रामाणिक लोकहित यासाठी चांगले काम करणाऱ्यांना धोका नाही. अधिकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहेत. त्यांच्याविषयी आदरभाव ठेवावे. असे आवाहन माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख यांनी केले. आटपाडी पंचायत समिती येथे आयोजित जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र खरात होते.
सुरुवातीस प्रास्ताविक सचिन फोंडे यांनी केले. आपण माहिती का मागवतो हे पारदर्शकपणे आपल्या मनाशी व इतरांशी सांगता आले पाहिजे, असे यावेळी बोलताना शाहीन शेख म्हणाले.
यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाघमारे, पुरवठा अधिकारी दादासो पुळके, भूमी अभिलेख अस्लम मुजावर, प्रभारी उपशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे, कक्ष अधिकारी सौ. व्ही. पी. मंडले, ए. टी. मगदूम, पी. एस. शिपुरे, निवृत्त अधिकारी फिरोज शेख, एड. त्रिशाला पाटील, आयुब सुतार, प्रमोद सुतार, विनोद कदम उपस्थित होते. आभार राजू शेख यांनी मानले. यावेळी बहुसंख्य अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.