| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
महायुतीच्या जागा वाटपाबाबतच्या चर्चेसाठी महाराष्ट्रातील नेते राजधानी नवी दिल्लीत ठोकून आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर या नेत्यांचे चर्चेचे खल सर्व आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही या बैठकीस उपस्थित आहेत.
महायुतीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काही जागावर अद्यापही एकमत होत नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता अमित शाह यांनी पुढाकार घेतला असून, त्यांची भूमिका महत्त्वाचे मानले जात आहे.
जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी घटक पक्ष जागांची आदलाबदल करण्याची शक्यता आहे. अजित पवार गट वाट्याला आलेल्या जागांबाबत नाराज असून त्यांनी स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता अमित शाह यांनी या तिन्ही याच्या मध्ये समजूनच घडवण्यासाठी एकत्र बैठक घेतली आहे. त्यांच्याच भाजपा व शिंदे शिवसेना काही जागावर पाणी सोडण्यास तयार झाले की चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आतापर्यंत महायुतीत तिने पक्षाकडून 182 जागांची कृष्णा करण्यात आली आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. परंतु उर्वरित 106 जागांपैकी 22 जागांवर मतभेद निर्माण झाले आहेत. पैकी काही जागांवर एकमत घडविण्यात अमित शाहू यांना यश आले असले तरी अद्यापही सात आठ जागांचा तिढा कायम आहे. मात्र हा तिढा चर्चेतून सोडवला जाऊ शकतो असा भाजपचा वरिष्ठ नेत्यांना विश्वास आहे.
दरम्यान काही जागांचा वाद विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रचार सभांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रचार यंत्रणेत महायुतींच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. भाजपा, शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या वतीने एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जागा वाटपाचा वाद तातडीने सोडवण्यावर सर्वच नेत्यांचा भर असून मतदारांत गैरसमज निर्माण होऊ नये, नाही म्हणूनही प्रयत्न करण्यात येणार आहे. तिन्ही पक्षातील वादग्रस्त जागावर एकमत होईल न होईल, पण अंतर्गत वाद कसा मिटवायचा हा प्रश्न महायुतीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.
महायुती असो वा महाआघाडी अंतर्गत वाद रोखून बंडखोरीला आळा घालण्यासाठी आणि त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये म्हणून, इच्छुकांच्या नाकदु-या काढण्यात येत आहेत. महायुतीला पुन्हा सत्ता हवी आहे. तर महाआघाडी महायुतीला धोबीपछाड देऊन सत्तारूढ होऊ पाहत आहे. आता यामध्ये कोण यशस्वी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.