| सांगली समाचार वृत्त |
हरिद्वार - दि. १८ ऑक्टोबर २०२४
द्विशतकाच्या उंबरठ्यावर असलेली देशाची लाईफ लाईन समजली जाणारी रेल्वेने आता कात टाकली असून, वंदे मातरम सारख्या वेगवान रेल्वेने आपला सारा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. मुंबई-पुण्यातील मेट्रोने आपलं देखण्या रुपड्याने स्थानिक प्रवाशांना आकर्षित केले आहे. या पार्श्वभूमीवर या रेल्वेबद्दल नेहमीच उत्कंठावर्धक माहिती आपणांसमोर येत असते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडिओ दर्शकांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बातमी आहे थेट हरिद्वार मधील. येथील गंगा कालवा बंद झाल्यानंतर हर की पैडी आणि व्हीआयपी घाट येथे अखंड वाहणारा गंगा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी गंगेच्या तळात रेल्वे रुळाचे लोखंडी ट्रॅक उघडे पडल्याने सर्वप्रथम येथील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. सर्वांनी गंगा तीराकडे आपला मोर्चा वळवला, येथील उघड्या पडलेल्या रेल्वे रुळाचे आपल्या मोबाईलवर अनेकांनी फोटो आणि व्हिडिओ शूट केले. अल्पावधीतच अख्या हरिद्वार बरोबर देश विदेशात हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
आता सर्वांना प्रश्न पडला आहे तो, हे रेल्वे रूळ गंगा नदीच्या तळाशी कुठून आले ? पत्रकारांनी याचा शोध घेण्यासाठी इतिहासकारांचे मदत घेतले आणि सामोरी आली एक उत्कंठावर्धक माहिती... हरिद्वार चे जुने तज्ञ आदेश त्यागी यांच्या मते गंगा कालव्याच्या बांधकामादरम्यान 850 मध्ये येथे या रेल्वे रुळावरून बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी हात गाड्यांचा वापर केला जात होता. धरण कोठी ते भीमगौडा बॅरेज पर्यंत धरण नि बंधारे बांधण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरावे, काम लवकर व्हावे या उद्देशाने लोखंडी रूळ टाकून त्यावरून या हात गाड्या साहित्याचे ज्ञान करीत होत्या. यावेळी पाण्यावर धावणारी एक गाडीही असल्याचे इतिहासात वर्णन सापडते.
प्रा. डॉ. संजय माहेश्वरी या इतिहास तज्ञांच्या मते, हा गंगा कालवा लॉर्ड डलहौसीने तयार केला होता यासाठी अभियंता कोथळे यांच्या देखरेखाली सर्व बांधकाम पूर्ण झाले. भारतातील पहिला रेल्वे मार्ग रुरकी कोलियरीजवळ तयार करण्यात आला होता.
हा कालवा प्रतिवर्षी उत्तर प्रदेश पाटबंधारे विभागाकडून देखभाल करण्यासाठी बंद केला जातो. यामुळे हरिद्वारचे दृश्य पूर्णपणे बदलून जातं. याच काळात या रेल्वे ट्रॅकचे गुपित सर्वांसमोर आले. मात्र अद्याप या रुळाबद्दल उपलब्ध झालेले माहिती नेमकी विश्वासार्ह आहे का ? असा सवाल जनतेतून केला जात आहे. आता पर्यटन, बांधकाम विभाग आणि इतर काही महत्त्वपूर्ण शासकीय विभागाकडून याबाबत माहिती संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे.