Sangli Samachar

The Janshakti News

अहमदाबादच्या सोनाराकडून सोने खरेदीसाठी दिलेल्या नोटांवर महात्मा गांधी ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो !


| सांगली समाचार वृत्त |
अहमदाबाद  - दि. २ ऑक्टोबर २०२४
अहमदाबाद येथील सोन्या-चांदीचा व्यापार करणाऱ्या लेखक व्यवसायिकाला फसवण्यात आले असून, सोने खरेदी केल्यानंतर दिलेल्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो आढळला आहे, तर रिझर्व बँक ऐवजी 'RESOLE BANK OF INDIA' असं लिहिण्यात आलं होतं. बाकी नोटेचा आकार रंग आणि डिझाईन खऱ्या नोटा प्रमाणेच होते. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 23 सप्टेंबर 2024 रोजी अहमदाबाद येथील सोने चांदी व्यावसायिक मेहुल ठक्कर यांना त्यांच्या परिचयाच्या लक्ष्मी ज्वेलर्स मधील व्यवस्थापकाचा फोन आला. त्याने सांगितले की त्याला दोन किलो 100 ग्रॅम सोने घ्यायचे आहे. व याची किंमत किती होईल ? मेहुल हे लक्ष्मी ज्वेलर्स सोबत दीर्घकाळ व्यावसायिक करीत असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून 1.60 कोटी रुपयांमध्ये व्यवहार ठरला व दुसऱ्या दिवशी सोने देण्याचे ठरले.


दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरला लक्ष्मी ज्वेलर्सच्या व्यवस्थापक्यांनी मिळून यांना फोन करून सांगितले की सोने घेणारी पार्टी आणि असून, बँकेतून आरटीजीएस करण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे सोन्याच्या बदल्यात सिक्युरिटी अमाऊंट देऊन नंतर पैसे पाठवले जातील. सोने घेणाऱ्या व्यक्ती सीजी रोडवरील आंगडिया फर्ममध्ये थांबले आहेत, तेथेच ते व्यवहार करतील असेही लक्ष्मी ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाने सांगितले.

मेहुल थक्कर यांनी आपल्या कर्मचाऱ्याला दोन किलो 100 ग्रॅम सोने घेऊन सीजी रोडवर पाठवले त्या ठिकाणी तीन लोक उपस्थित होते. त्यापैकी एकाकडे पैसे मोजण्याचे मशीन होते तर दुसरी व्यक्ती सरदारजीच्या वेशात होते तर तिसरी व्यक्ती कर्मचारी बाहेर थांबली होती. सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1.30 कोटी रुपयांच्या नोटा सदर मशीन मधून मोजून ठक्कर यांच्या कर्मचाऱ्याकडे दिल्या, तर तीस लाख रुपये दुसऱ्या कार्यालयातून आणले जातील असे सांगितले. 

ही रक्कम घेऊन कर्मचाऱ्याने सोने सदर व्यक्तीच्या हाती सोपवले व तो मेहुल ठक्कर यांच्या दुकानात आला. ठक्कर यांनी या नोटा पाहिल्यानंतर सदरच्या नोटा बनावट असून त्यावर महात्मा गांधी यांच्या ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ठक्कर यानी सीजी रोडवरील आंगडिया फॉर्मकडे धाव घेतली, परंतु तेथे कोणीच आढळले नाही. त्यांनी लक्ष्मी ज्वेलर्स मधील व्यवस्थापकाला फोन केला असता तो नंबर हे बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

यानंतर ठक्कर यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली व सारा प्रकार कथन केला. आश्चर्याची बाब म्हणजे नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन उभा असलेला माणूसही ते मशीन देण्यासाठीच आला होता आणि त्या तो ओळखत नव्हता असे त्याने पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावरून आढळलेल्या व्यक्तींच्या तपासासाठी पथके तयार केली असून सदर व्यक्तींचा मागावर पाठवले आहेत. ही घटना अहमदाबादमधील सराफ व्यवसायिकांना समजल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.