Sangli Samachar

The Janshakti News

सुभाष चौक गणेशोत्सव मंडळातर्फे सांगली दर्पणचे संपादक विकास गोंधळे यांना आरोग्य सेवक सन्मानपत्र !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ सप्टेंबर २०२४
सांगली दर्पण या लोकप्रिय पोर्टलचे संपादक विकास गोंधळे यांना, सांगलीतील सुभाष चौक गणेशोत्सव मंडळातर्फे कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते तसेच काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या उपस्थितीत 'आरोग्य सेवक' सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय बजाज, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, रणजीत पाटील सावर्डेकर आणि सुभाष चौक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

विकास गोंधळ हे पत्रकारितेबरोबरच सामाजिक सेवेत कार्यरत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुभाष चौक गणेशोत्सव मंडळातर्फे, त्यांना आरोग्य सेवक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.