Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 1.30 कोटी महिलांना 'सुभद्रा' योजनेअंतर्गत मिळणार मोठी आर्थिक भेट !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजना आणली आहे. ज्याद्वारे लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. योजना लागू झाल्यानंतर विरोधकांनी 'पंधराशे रुपयांत महिना कसा काढायचा ?' अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथील सभेत बोलताना महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर आता महिलांच्या बँक खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरमहा ठराविक रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे महिलांचे मासिक बजेट बरेचसे सोपे होणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा येथील जाहीर कार्यक्रमात 'मोदी की गॅरंटी' दिली होती. त्यानुसार भाजप सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक महिलेला पाच वर्षात 50 हजार रुपये मिळतील असे जाहीर केले होते. त्यानुसार आज 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान ओडिशा येथील एका विशेष कार्यक्रमात पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जारी करतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे येथे सुभद्रा योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामधील संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, वयाचे प्रमाणपत्र, आणि बँक खाते क्रमांक याची द्यायची आहे. फॉर्म ऑनलाइन भरण्याची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.