Sangli Samachar

The Janshakti News

रोह्याचे पत्रकार मिलिंद आष्टीवकर मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ सप्टेंबर २०२४
रोहा येथील पत्रकार मिलिंद अष्टीकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. पुढील दोन वर्षे अष्टीवकर परिषदेचे नेतृत्व करतील. दरम्यान रायगड जिल्ह्याकडे परिषदेचे नेतृत्व दुसऱ्यांदा येत आहे यापूर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हा दोन वर्षांनी अध्यक्ष होतो. अष्टीवकर 2022 ते 2024 या कालावधीत कार्याध्यक्ष होते. मराठी ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 45 वे अध्यक्ष असतील.

मिलिंद अष्टीवकर हे गेली 20 वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी भूषवले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आणि त्यानंतर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 

लोकमत, कृषीवल आणि अन्य दैनिकांसाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा, आणि चळवळीशी नातं सांगणारा कार्यकर्ता-पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक चळवळीची त्यांचा जवळचा संबंध आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या लढ्याचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले होते. पत्रकारांच्या हक्कासाठीच्या लढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात परिषदेने उभारलेल्या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


दरम्यान मिलिंद अष्टीवकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिषदेचे नेते एस. एम. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांनीही मिलिंदअष्टीवकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या विद्यमान कार्यकारणीची मुदत संपली असून, मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीने उल्लेखनीय कार्य केले आहे. या काळात परिषदेच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, तालुका आणि गाव पातळीपर्यंत शाखा विस्तार झाला आहे. या काळात पत्रकारांच्या हक्काचे विविध लढे लढले गेले. राज्यातील शेकडो पत्रकारांना मदत करण्याची भूमिका परिषदेने घेतले आहे. ही चळवळ अधिक गतिमान केल्याबद्दल एस. एम. देशमुख यांनी शरद पाबळे, सरचिटणीस मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी आणि सर्व कार्यकारिणीला धन्यवाद दिले आहेत.