Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत 288 पैकी 173 जागावर एकमत, उर्वरित जागेवर चर्चेअंती लवकरच निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे नुकतेच दुसरी फेरी पार पडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागावर एक मत झाले असून भाजपला सर्वाधिक तर शिवसेना शिंदे गटाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा देण्याचे ठरविण्यात आले आहे. परंतु अद्याप कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय झाला नाही. उर्वरित 115 जागावर पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.

जागावाटप निश्चित करण्यासाठी अजून दोन ते तीन बैठे त्यांच्या फेऱ्या होतील. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.


दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी नागपूर येथे बोलताना 2019 च्या निवडणुकीत आम्ही 54 जागा जिंकल्या होत्या यावेळी आम्हाला काँग्रेसचे तीन आमदार आणि तीन अपेक्षांचा पाठिंबा असल्याने आमची ताकद वाढली आहे, त्यामुळे आम्ही 60 जागांवर मागणी करणार आहोत. काँग्रेसचे हिरामण खोसकर, विशाल सिद्धकी, आणि सुलभा खोडके, त्याचप्रमाणे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हेही आमच्या सोबत येणार असल्याचा उल्लेख, अजित पवार यांनी नागपूर येथे संपन्न झालेल्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना केला आहे. 

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यासाठी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून जोमाने तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत मतभेद होऊ न देता एकसंघपणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे गेलो तर आम्हाला पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. असेही राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.