Sangli Samachar

The Janshakti News

'जन्म बाईचा-खूप घाईचा'... शब्दशः होतंय खरं, लहान वयातच मुली होताहेत 'मोठ्ठ्या', पालकांच्या चिंतेत नवी भर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ सप्टेंबर २०२४
'जन्म बाईचा खूप घाईचा'... असं आपल्याकडे पूर्वापार बोललं जात आहे. आणि ते खरंही आहे. पूर्वी पहाटेच्या पहिल्या प्रहरापासून बाईचा दिवस सुरू व्हायचा. हा दिवस संपायचा तो घरची पुरुष मंडळी 'निवांत'झाल्यावर... दुखणी खुपणी बाजूला ठेवून, घरातील महिला राम रगाड्याला जिंकून घ्यायची. बरं तक्रार करायला जागाही नसायची... कारण, तिला राबवून घेण्यात त्या घरच्या वयस्कर बाईचा सहभाग असायचा...

दिवस पालटले. जग बदललं. तसे बाईच्या पाठचे भोग हे बदलले. पण फक्त संदर्भाने... आजही तिच्या पाठचे भोग संपले असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. कधी हे भोग सुधारलेल्या सासरचे असतात, कधी ते कामाच्या ठिकाणच्या बॉसचे असतात... कधी कामानिमित्त होणाऱ्या प्रवासात असतात... बाई तक्रार करणार तरी कुठे आणि कशी ?...


पण आता एक नवीन चिंता बाईच्या नशिबी आली आहे... आपल्या मुलींची... पण ती केवळ नराधमांच्या अत्याचाराला बळी पडण्या बरोबरच, लहान मुली वयाच्या मानाने लवकर 'वयात' येत आहेत... काही मुलींना पूर्वीच्या प्रमाणात लवकर 'पाळी' अर्थात 'पिरियड' येऊ लागले आहेत. आणि हीच पालकांसाठी, विशेषतः महिलांना डोकेदुखी ठरत आहे. 

एका संशोधनानुसार वयाच्या अकरा वर्षांपूर्वी मासिक पाळी येणाऱ्या मुलींची संख्या 8. 6% वरून 15. 5% झाली आहे आणि नऊ वर्षांपूर्वीच मासिक पाळी येणाऱ्या मुलींची संख्या दुपटीने वाढली आहे. लहान वयात येणारा लठ्ठपणा हे लवकर पाळी येण्यामाचे प्रमुख कारण असल्याचे लोकांचे मनाने आहे. लठ्ठपणामुळे शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढते जी मासिक पाळी लवकर सुरू झाल्याचे सुचित करते. त्याचप्रमाणे वाढता ताण-तणाव हेही लवकर पाळी येण्यामागचे कारण असल्याचे आहे म्हणणे आहे. वाढत्या ताण-तणावामुळे कोर्टी सोल आणि एन्ट्रोजन हार्मोन्सची पातळी वाढते. तर काहींच्या मनानुसार वातावरणातील वाढते केमिकल्स हे ही यामागील कारण आहे. 

पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स...

नियमित व्यायाम : अलीकडे मुलांप्रमाणेच मुलींचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेत, क्लासमध्ये मुलींचा अधिकतर वेळ अभ्यासात पर्यायाने बैठ्या व्यवस्थेत जातो. त्यानंतर मुली घरी आल्या की मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यामध्ये आपला वेळ घालवितात. परिणामी शरीराला आवश्यक तो व्यायाम मिळतोच असे नाही. याचा परिणाम जाडी वाढते.

संतुलित आहार

अलीकडे मुलींमध्ये इन्स्टंट आणि चटपटीत खाण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. शाळा कॉलेजेसमध्ये तर, कॅन्टीनमध्ये चायनीज डिशेसे प्रमाण वाढले आहे. भेळ, पाणीपुरी, आणि महत्त्वाचे म्हणजे पिझ्झा बर्गर हे मुलींचे आरोग्याबाबत शत्रूच मानले पाहिजेत. आणि नेमके ते खाण्याकडेच मुलींचा अधिकतर भर असतो. यासाठी पालकांनी मुली आहाराकडे लक्ष देण्याचे गरज आहे.

तज्ञांचा सल्ला

याशिवाय मुली वयात येत असताना, तज्ञांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. ज्याकडे अनेक पालकांमध्ये जागरूकता असतेच असे नाही. परंतु आता तज्ञांचा सल्ला ही काळाची गरज बनत आहे. अज्ञान पालक तर 'नशिबाचे भोग' म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. यासाठी प्रथम मुलींपेक्षा पालकांचेच प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गरज आहे ती, लवकर पाळी येणाऱ्या मुलींचे प्रबोधन करण्याची. आणि यासाठी शाळा आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवश्यकता आहे.