Sangli Samachar

The Janshakti News

आ. सुधीर दादा गाडगीळ यांची राजकीय निवृत्ती, संघटनात्मक व समाजकारणात सक्रिय राहणार; निवृत्ती मागे घेण्यासाठी वाढता दबाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ सप्टेंबर २०२४
गेल्या २ विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असून यापुढे आपल्या कारकिर्दीतील अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास तसेच संघटनात्मक आणि समाजाकारणात सक्रीय राहणार असून सांगलीकर जनतेने गेली १० वर्षे मला सेवेची संधी दिली आणि प्रेम व आशिर्वाद दिले तेच प्रेम व आशिर्वाद सांगलीकर जनतेने भविष्यातही द्यावे, अशी विनंती सांगलीचे आमदार धनंजय उर्फ सुधीरदादा गाडगीळ यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात केली आहे. आ. सुधीरदादा यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, सांगलीकर मायबाप जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे दहा वर्षांपूर्वी मी सांगलीकरांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पोहोचलो. त्या आधीपासूनच आमचे गाडगीळ घराणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजकारणात होतेच. मीही भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षे सांभाळली होती. अनेक निवडणुकीत पक्षाने दिलेल्या जबाबदा-यांचे पालन मी यशस्वीपणे केले होते. 

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटनेने मला उमेदवारी दिली. जनतेच्या आशिर्वादामुळे पक्ष कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मी विजयी झालो. गेल्या दहा वषांत सांगलीचा सेवक म्हणून मी जनतेची निष्काम भावनेने सेवा केली. सांगली विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी प्रश्न तडीस नेण्याचे प्रयत्न केले. सन २०१४ पूर्वी सांगली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती, खराब रस्त्यामुळे जनतेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम सांगलीतील रस्त्यांचा प्रश्न मार्गों लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विधानसभा क्षेत्रातील शहरी भाग, शहराचा विस्तारित भाग तसेब विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न हाती घेतला. खराब रस्ते ही लोकांची सातत्याने डोकेदुखी होती. रस्त्यावरून जाणेही मुस्किल होऊन बसले होते, अतिशय दयनीय अवस्था असल्यामुळे ती दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक रस्ते चांगले केले नव्याने बांधले व चांगले केले त्यामुळे विधानसभा क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळाला. सांगलीतील रस्त्यावरून जाणे लोकांना सुसह्य झाले. 


बरीच वर्ष प्रलबित असणाऱ्या व सांगलीला भेडसावणाऱ्या सांगली-पेठ रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यश आले व सध्या काम सुरु आहे. सांगली विधानसभा मधील सांगलीत येणारे प्रमुख रस्ते, छोटे-मोठे पूल, ग्रामीण भागातील मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ते तसेच बिबिध योजने मधील विकास कामे मंजूर असून येणाऱ्या काळात पूर्ण होतील.

सांगली सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांचे आशास्थान आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमाभागातील अनेक गोरगरीब रुग्ण या ठिकाणी औषधोपचारांसाठी येतात; परंतु या रुग्णालयाकडे यापूर्वी तसे दुर्लक्षच होते. मी आमदार झाल्यानंतर मात्र या हॉस्पिटलमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी आणि नवे विभाग निर्माण करण्यासाठी अधिक लक्ष दिले. अनेकदा शासन दरबारी हा विषय मांडला. सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार करावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आता उपलब्ध झालेल्या आहेत. तेथे जझऊ बिल्डींग चे काम पूर्ण झाले असून त्याचे कामकाज पूर्ण आहे.

सध्या १०० खाटांचे नवीन माताबाल संगोपन रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे तसेच हॉस्पिटलच्या आवारात १०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालयही होत आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा ऑक्सिजन प्लांट तसेच ऑक्सिजन व्हेंटिलेटर सुरू केले. आजपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलला नवीन अत्याधुनिक रूप दिले.

सांगलीतील विश्रामबाग येथे रेल्वेच्या फाटकाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. सांगलीतून कुपवाड आणि त्या परिसराकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांना रेल्वेच्या फाटकापाशी खोळंबून थांबावे लागत असे. काहीजण हे फाटक गडबडीने ओलांडून जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यावेळी अनेकदा अपघातही झाले होते, त्यामुळे या विश्रामबागच्या रेल्वे फाटकाच्या तिथे उड्‌डाणपूल व्हावा अशी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. १९७५ पासून लोक त्यासाठी सतत अर्ज, विनंती करीत होते. त्यासाठी परिसरातील नागरिकांनी तत्कालीन आमदार, खासदार, नामदार, महाराष्ट्र शासनाचे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटून अथक प्रयत्न केले होते, अनेकदा आंदोलनही झाली होती. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी हा विषय आपल्या हातात घेतला, सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावला. त्या उड्डाणपुलामुळे लोकांची अडचण दूर झाली आहे.

हरिपूर ते कोथळी हे अंतर नदीतून लोकांना पार करावे लागत असे. गेली शेकडो वर्षे नदीतून नावेच्या सहाय्याने हा प्रवास सुरू होता. अर्थात पावसाळ्याच्या दिवसात आणि नदीला पाणी जास्त असेल तेव्हा हा प्रवास धोकादायकही होता, या प्रवासाला तसेच मालवाहतुकीलाही मर्यादाही येत होत्या. त्या ठिकाणी कृष्णा नदीवर उड्डाणपूल व्हावा अशी लोकांची अनेक वर्षांची मागणी होती. हे काम मंजूर करून घेतले आणि झपाट्याने पूर्णही झाले. या पुलामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील अंतर एका फटक्यात कमी झालेले आहे. 

सांगलीतील हे दोन मोठे पूल उभे केल्यानंतर आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पूल जुना झाला होता. हा आयर्विन पूल १९२९ मध्ये सांगलीच्या संस्थानकाळात बांधला गेलेला आहे. साहजिकच त्या पुलाची ताकद केल्या काही वर्षामध्ये कमी व्हायला लागली होती. त्यामुळे त्या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली होती. विशेषतः आयुर्विन पुलावरील जड वाहतूक बंद झाल्यामुळे त्याचा फटका सांगलीतील व्यापाराला फार मोठ्या प्रमाणावर बसला. त्याचवेळी कोकणातील सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना ताजी होती जे माझ्या मनातून काही केल्या जात नव्हती अशी दुर्घटना येथे व्हायला नको असं मला सारखं बाटू लागलं आणि आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम हाती घेतले. त्यासाठी शासनाकडून प्रस्ताव मंजूर करून तो पूलही आता चांगलाच मार्गी लागलेला आहे. तो काही दिवसातच वाहतुकीसाठी लोकांना खुला होईल.

सांगलीकरांची अनेक कामे या दहा वर्षात मार्गी लावल्याचे समाधान मला आहे. आई वडिलांनी लहानपणापासून सेवा धर्माचे संस्कार दिले. त्याचप्रमाणे वागण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. सांगली शहरातील गुंठेवारी वसाहतीचा भाग हा तसा उपेक्षितच. रस्ते, लाईट पाणीपुरवठा याबाबत कायमच तेथे नागरिकांच्या तक्रारी असत. या भागाकडे आमदार म्हणून अधिक लक्ष दिले. आमदार निधीतूच्या माध्यमातून अनेक विकासकामे तेथे केली. शामरावनगर आणि सांगली शहरातील अन्य उपनगरांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. 

सांगली ही नाटपपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु या नाट्यपंढरीमध्ये सुसज्ज अशा नाट्यगृहाचा अभाव सातत्याने जाणवत होता, सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक अशा सुसज्ज नाट्यगृहाची सातत्याने मागणी करीत होते. यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा करून सुसज्ज नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. आता हे नाट्यगृह सांगलीच्या विस्तारित भागात लवकरच उभे करण्यात येणार आहे. त्यामुळे विस्तारित भागातील नागरिकांना आणि नाट्य रसिकांना एका सुसज्ज नाट्यगृहाचा लाभ होणार आहे. 

माझ्या विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाकडे ही २०१४ पूर्वी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. २०१४ नंतर मी आमदार म्हणून काम करत असताना प्रामुख्याने माझ्या विधानसभा क्षेत्रातील अकली, बामनोळी, बिसूर, बुधगाव, हरिपूर, इनाम धामणी, जुनी धामणी, पदमाळे, माधवनगर, नांद्रे, कावजी खोतवाडी, वाजेगाव ही गावे येतात त्या गावांमध्ये अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, तीर्थक्षेत्रांच्या विकास योजनेच्या माध्यमातून देवस्थानाचा विकास, गावातील लहान पूल, समाज मंदिरे, गटारी, शाळा, आरोग्य केंद्र आशा विविध लोकोपयोगी कामे करून गावाचा विकास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. आज पर्यंत जेवढा निधी या गावांना आला नव्हता इतिहासात सर्वाधिक निधी आणण्यात यशस्वी झालो. 

या दहा वर्षांत सांगलीकरांची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. 

२०१८ मध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. मी राज्य सरकारच्या माध्यमातूनही दैनंदिन नागरी सुविधांचे प्रन्न सोडविण्याचे प्रयत्न केले. माझ्या हातून सर्व प्रश्न सोडविले गेले, असा दावा मी करणार नाही. 

जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी दैनंदिन संपर्क साधण्याची, त्यांच्या अडीअडचणी ऐकण्याची व्यवस्था तयार केली. भारतीय जनता पार्टीने मला दिलेल्या संधीचे सार्थक करण्याचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरविण्याचे मी मनापासून प्रयत्न केले. मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकलेला विश्वास हीच माझ्या कामाची प्रेरणा होती. या विश्वासातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला.

मागील पाच वर्षे केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टनि पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून २०१९ ला उमेदवारी दिली. विरोधकांनी खूप अप्रचार केला. मी कुणालाही उत्तर दिले नाही माझं काम हेच उत्तर समजले. परंतु त्यावेळीही तुम्ही सांगलीकर मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी केले.

आजपर्यंत काम करत असताना माणूस आणि माणुसकी यांना केंद्रस्थानी मानून काम केले. जात, पात, धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता सर्वांची कामे करून समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जाण्याचा सातत्याने प्रयत्न केला. काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील, या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे.

राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, या मताचा मी आहे. आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे. आमच्या संघटनेची कार्यपद्धती' प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी अशी आहे. मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो, तरी मी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे. पण आता मला विधानसभा उमेदवारी नको, अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली आहे. 

'करुनी अकर्ते होऊनियां गेले, तेणे पंथे चाले तोचि धन्य तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी' अशी माझी या क्षणी भावना आहे. माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहील असा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्यांना बिजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.