| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ सप्टेंबर २०२४
वैद्यकीय व्यवसायाचा अधिकृत परवाना नसताना प्रकाश बाळू मकामले (रा. कुंभारवाडी, तालुका शिराळा) यांनी चुकीच्या पद्धतीने अघोरी उपचार करून जालिंदर महादेव माळी या एसटी वाहकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे, रोहणाच्या उभारताना अकरा लाख साठ हजारांची भरपाई देण्याच्या आदेश सांगली येथील ग्राहक मंचाचे, प्रमोद गोकुळ गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील मनीषा वनमोरे यांच्या पीठाने दिले आहेत. शिवाय संबंधित डॉक्टर विरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की जालिंदर महादेव माळी या एसटी वाहकास संधिवात व मणक्याचा आजार होता. उपचारासाठी ते कुंभारवाडी येथील प्रकाश किरण आयुर्वेदिक व ॲक्युप्रेशर केंद्रात जात होते. यावेळी प्रकाश मकामले यांनी बायो हेल्थ या उपकरणावर झोपवले. उपचारादरम्यान माळी यांना मोठा त्रास झाला. तरीही त्याने उपचार सुरूच ठेवले होते. यापुढेही सात वेळा असे उपचार घ्यावे लागतील असे मकामले यांनी सांगितले. माळी यांच्या घरी येऊन इंजेक्शन दिल्यानंतरही दुखण्यात काहीच फरक पडला नाही.
त्यावेळी मकामले याने तीन लाखात खात्रीशीरित्या उपचार होतील, असे सांगून पैशाची मागणी केली. यावेळी नातेवाईकांनी कर्ज काढून मकामले याला दिले. यादरम्यान केलेल्या उपचारामुळेही कोणताच फरक पडला नाही. उलट जालिंदर माळी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी नातेवाईकांनी प्रकाश बाळू मकामले याच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी ही तक्रार बेदखल केली. त्यामुळे नातेवाईकाने सदर डॉक्टर विरोधात ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचासमोर ॲड. आर. बी. पाटील व ॲड. पी. बी. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.
मकामले याने मृताच्या वारसांना औषधोपचार व इतर खर्च पोटी 11 तीस दिवसात द्यावेत त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक व शिराळा पोलीस निरीक्षकाने तात्काळ फिर्याद नोंदवून घ्यावी मकामले याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रकाश मालामले याचा वैद्यकीय परवाना व पदवी बाबत पंधरा दिवसात न्यायालयात अहवाल द्यावा, असे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहेत.