Sangli Samachar

The Janshakti News

कृष्णा नदीच्या महापुरापासून सांगलीकरांना वाचविणारा योद्धा, विजयकुमार दिवाण काळाच्या पडद्याआड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ सप्टेंबर २०२४
सांगली येथील पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व २ नातवंडे असा परिवार आहे. डॉ. अभिषेक दिवाण यांचे वडील होत.

जत आणि कवठे महांकाळ विभागात लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण व बांधकाम केले. यानंतर सांगली पाटबंधारे विभागात १९८० सालापासून सेवानिवृत्ती पर्यंत कृष्णा नदीचे पूर नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन यावर प्रदीर्घ काम केले.

त्या बरोबर, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच अभियंता पतसंस्था सांगली, संस्थापक संचालक अध्यक्ष पद भूषवले. संपूर्ण सेवकाल हा सातारा व सांगली जिल्हात गेला. त्यांचे

जसंपदा खात्या मध्ये प्रधान सचिव, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांच्याशी व्यक्तिगत स्नेहसंबंध होते.


सांगलीच्या पाणी विषयक समस्या, कृष्णा महापूर, शेरी नाला दूषित पाणी पुरवठा, शामराव नगर येथे पाण्याची दलदल या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयीन स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा हा अगदी कालपर्यंत चालू होता. सांगली कोल्हापूर महापूर येऊ द्यायचा नाही यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील होते.

समितीच्या माध्यमातून शांसंनवर सातत्याने दबाव आणून पूर नियंत्रणाचे यशस्वी काम केले होते. यासाठी त्यांच्यासोबत सातत्याने निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, प्रमोद माने, सुयोग हावळ, सर्जेराव पाटील इत्यादी कार्यकर्ते कार्यरत होते. कृष्णा. महापूर समितीचे त्यांच्या जाण्याने कधीही न भरणारे असे नुकसान झाले आहे.