Sangli Samachar

The Janshakti News

पतंजलीच्या 'दिव्यमंजन' उत्पादनात माशांचा अर्क ? उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे सर्वत्र खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ सप्टेंबर २०२४
दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागल्यानंतर आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'दिव्य मंजन' या उत्पादनाच्या पॅकिंगवर हिरव्या रंगाचे वर्तुळाकार चिन्ह दाखवले आहे. या चिन्हाचा अर्थ सदर उत्पादन हे शाकाहारी आहे असा होतो, मात्र प्रत्यक्षात या मंजन मध्ये माशांचा अर्क वापरला जात असल्या करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

याचिका करताना तक्रारीत म्हटले आहे की सदर उत्पादन शाकाहारी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आपण हे मंजन वापरत आहोत. वनस्पती आधारित शाकाहारी मंजन असल्याचा आपला समज होता. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की, यामध्ये माशांचा अर्क असलेले समुद्रफेन वापरले जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.


यतीन शर्मा नामक वकिलांनी ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केले असून दिव्य म्हणजे उत्पादनाच्या पाकिटावर शाकाहारी उत्पादन असण्याचे हिरवा रंगाचे चिन्ह दाखविले गेले आहे. ही ग्राहकांची दिशाभूल तर आहेच, याशिवाय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचेही ते उल्लंघन आहे. 

ही माहिती समोर आल्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबीयांना धक्का बसला तसेच आमच्या धार्मिक आस्था आम्हाला मासे उत्पादने वापरण्याची परवानगी देत नाही असेही याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. मध्यंतरी योगगुरु बाबा रामदेव यांनी एका युट्युब व्हिडिओमध्येही दिव्यमंजन मध्ये समुद्र फॅन वापरले जात असल्याचा खुलासा केला होता, असेही यतीन शर्मा यांनी म्हटले आहे. 


दरम्यान दिव्य मंजन उत्पादनाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून घेतल्यानंतर देशभरात जी शाकाहारी कुटुंबे हे मंजन वापरतात त्यांच्यामध्ये खळबळ माजली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.