| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
सांगली महापालिकेचे आयुक्त मा शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रामध्ये दि. १९/०९/२०२४ ते २/१०/२०२४ या कालावधीमध्ये 'स्वच्छता ही सेवा अभियान' राबविण्यात येणार आहे. या काळात विविध कार्यक्रम होणार आहेत.
उपआयुक्त वैभव साबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. डॉ रवींद्र ताटे, सहा आयुक्त, खाते प्रमुख, अधिकारी, समनव्यक वर्षाराणी चव्हाण, स्वच्छता निरीक्षक सहभागी होऊन कार्यक्रम होणार आहेत.
खालील तारखेस हे कार्यक्रम राबविण्यात येतील.
दि. १९/०९/२०२४ ते १/१०/२०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा शपथ कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार असून, या कालावधीत मनपा क्षेत्रातील विभागनिहाय स्वच्छता ही सेवेची माहिती देण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
दि. १९/०९/२०२४ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये १२ शाळा सहभागी होऊन, साधारणपणे २५०, मुलामुलींच्या मानवी साखळी मध्ये सहभाग घेतला. क्रीडाधिकारी अहमद जेलर यांनी सदर मानवी साखळी यांचे नियोजन केले होते.
दि. २०/०९/२०२४ रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या NGO ,सामाजिक संस्था यांची बैठक घेण्यात येणार आहे.
दि. २१/०९/२०२४ ते दि. २८/०९/२०२४ या कालावधीमध्ये विभाग प्रमुखाने 'एक पेड माँ के नाम ही मोहीम' राबवायची आहे. यामध्ये अभिनव कल्पना राबविण्यात येत आहे.
महापालिका कर्मचारी, अधिकारी हे एक झाड लावून आपल्या आईबद्दल आदर भावना व्यक्त करण्यात येणार आहे. सेल्फी देखिल काढून सादर करणार आहेत.
दि. २४/०९/२०२४ रोजी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
बालगंधर्व येथे २६/०९/२०२४ रोजी कार्यक्रमांचे आर्किटेक्चर कॉलेज टाकाऊ मपासून टिकाऊ स्पर्धा आणि बचत गट यांच्यामार्फत फूड स्ट्रीट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात होणार आहे .
दि.२५/०९/२०२४ रोजी महापालिकेच्या वतीने निदान केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
दि.३०/०९/२०२४ रोजी आरोग्य विभागातील सफाई मित्रांना जलनिस:रण सर्व सफाई मित्रांना PPE किट देण्यात येणार आहे.
दि.१/१०/२०२४ रोजी सर्वोत्कृष्ट सफाई मित्र घोषित करण्यात येणार आहे.दि. २ ऑक्टोंबर स्वच्छ भारत दिवसाचे नियोजनानुसार सांगली येथील कोल्हापूर रोड, दूरदर्शन केंद्र या ठिकाणी महा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच 'एक पेड माँ के नाम ही मोहीम' राबविण्यात येणार आहे.