| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १९ सप्टेंबर २०२४
सांगलीचे तत्कालीन सेवानिवृत्त जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांचे आज पुणे येथे वार्धक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. १९८२ ते ८६ अखेर त्यांनी सांगली जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. अत्यंत धाडसी अधिकारी म्हणून त्यांचा गवगवा होता.
सांगलीचा प्रसिद्ध मारुती रोड अतिक्रमणमुक्त करून रस्ता मोठा करण्यात जिल्हाधिकारी वाघ यांचे मोठे श्रेय आहे. सांगलीच्या तमाम पत्रकारांसाठी पहिल्यांदा पत्रकार हाउसिंग सोसायटी निर्माण करून, पत्रकारांना आपल्या हक्काची घरे त्यांनी मिळवून दिली. काही प्रकरणात ते वादग्रस्त ठरले. परंतु घेतलेल्या निर्णयाशी ते कायम ठाम राहत. त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते.