| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १९ सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला काल झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला होता.
देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मार्ग आता प्रत्यक्षात येण्यासाठी प्रशस्त झाला आहे. एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत आणणार आहे त्यानंतर येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने 62 राजकीय पक्षांशी संपर्क साजरा होता. त्यापैकी 32 पक्षांनी एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे तर 15 पक्ष या विरोधात आहेत.
भाजपा व्यतिरिक्त नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. तर चंद्राबाबू नायडू यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा टीडीपी एक पक्ष तटस्थ राहिला आहे. काँग्रेस सह समाजवादी पार्टी, आदमी, आणि बसपा सीपीएम या मोठ्या पक्षासह इतर छोट्या १५ पक्षाने विरोध केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील टी एन डी ए सरकारच्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकार्याने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ता सादर केला जाईल असे सूतोवाच केले होते. हा कायदा अस्तित्वात आला तर, लोकसभा व विधानसभांच्या वेगवेगळ्या कार्यकाळात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनावर येणारा ताण आणि यावर होणारा खर्च यामध्ये कोट्यावधी रुपयांची बचत होणार आहे.