Sangli Samachar

The Janshakti News

सर्व पात्र लाभार्थ्यांनी क्षयरोग प्रतिरोधक लस घेण्याचे महापालिका आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांचे आवाहन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ सप्टेंबर २०२४
आज दि ३ सप्टेंबर २०२४ रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बीसीजी लस मोहिमेचे उद्घाटन मा.आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता (भा.प्र.से) यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ द्वारका नगर मिरज येथे केले, सदरची मोहीम ही आजपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्य क्षेत्रामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे.


यावेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजूषा दोरकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर चेतन हांडे सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली धुमाळ, डॉ. कुलकर्णी, तसेच क्षयरोग विभागातील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ उपस्थित होते.