| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ ऑगस्ट २०२४
सांगलीतील पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर कृष्णा काठी असणाऱ्या तीन मुख्य घाट आणि अमरधाम स्मशान भूमीची आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार तात्काळ स्वच्छता करण्यात आले. या स्वच्छतेमधून तिन्ही घाटावरून अंदाजे 70 टन कचरा , राडारोडा, नदीतून वाहून आलेला कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला. यानंतर त्या परिसरात तातडीने औषध फवारणी सुध्दा करण्यात आली.
सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर समर्थ घाट, विष्णू घाट आणि सरकारी घाट तसेच अमरधाम स्मशान भूमीत पाणी आले होते. तब्बल 12 ते 14 दिवस हे पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि नदीच्या प्रवाहातून वाहुन आलेला कचरा या ठिकाणी जमा झाला होता. कृष्णा नदीची पाणी पातळी कमी ह्यायला सुरुवात होताच, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक आणि 200 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तिन्ही घाट आणि अमरधाम स्मशान भूमीची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी बहुतांशी पाण्यातून वाहून आलेला गाळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला तर त्या सोबत आलेला कचरा, झाडी झुडूप, गवत , जलपर्णी आणि अन्य कचरा महापालिकेने संकलित केला. आज एका दिवसात तिन्ही घाट आणि अमरधाम स्मशान भूमीतून 70 टन राडारोडा स्वच्छ करीत कचऱ्याचे संकलन करण्यात आले. याचबरोबर त्या सराव ठिकाणी औषध फवारणी विभागाचे स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली आहे.