Sangli Samachar

The Janshakti News

'महंगाई डायन खा रही है सरकार शैतान बनकर लूट रही है |' देशातील करदात्यांची अवस्था - खा. विशाल पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ ऑगस्ट २०२४
देशातील करदात्यांची अवस्था 'महंगाई डायन खा रही है सरकार शैतान बनकर लूट रही है 'अशी अवस्था आहे. कराचा बोजा इतका जास्त आहे की उत्पन्न कुठे जाते हे कळतच नाही. सरकार गरिबांना लुटून श्रीमंतांची घरे भरत असल्याची जोरदार टीका खा. विशाल पाटील यांनी काल संसदेत बोलताना केली.

60 लाख कमावून करात लुटल्या गेलेल्या एका मित्राचे उदाहरण देताना खा. विशाल पाटील म्हणाले की, माझ्या मित्राला 17 लाखांची गाडी घेण्यासाठी साठ लाख कुठे गेले कळलेच नाही. कमाई आम्ही करायची, लुटायचे दुसऱ्याने आणि गोळा करायचे सरकारने ही चांगली भागीदारी आहे. बेंजामिन फ्रँक्लीनने म्हटले आहे की, कर वगळता जगात काहीही शाश्वत नाही. सरकारने हे खूप गांभीर्याने घेतलेले दिसते. इतके सारे कर लावले आहेत की, कमाई कुठे जाते हे कळतच नाही. आज काल ऑक्सिजनवरही कर लावला जातो आहे असं खा. विशाल पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले आहे.


नॉर्थ ब्लॉक मध्ये बसून ते डिक्शनरी उघडतात आणि जो पहिला शब्द दिसेल त्यावर कर लावून रिकामे होतात की काय अशी शंका येते. एखाद्याला आपली मालमत्ता विकायची असेल तर संकटच आहे. त्यावेळी सरकारच्या मदतीची गरज असते पण सरकार या काळात अधिकच कर वसूल करते. वास्तविक सरकारकडून अपेक्षा होते की एलटीसीजी कर कमी व्हावा. 'महंगाई डायन खा रही है सरकार शैतान बनकर लूट रही है |'अशी अवस्था आहे. रॉबिन हूड श्रीमंतांना लुटून गरिबांना देत होता, मात्र हे सरकार गरिबांना लोटून श्रीमंतांचे घरे भरत आहे अशी टीकाही खा. विशाल पाटील यांनी केली.

सेल्स व सरचार्ज लावून राजाचा वाटा चोरला आहे हे षडयंत्र आहे. महाराष्ट्र प्रचंड कर देतो, मात्र आमच्या वाट्याला काय आले ? सामान्य माणसाचा हा बदला घेणारा अर्थसंकल्प असल्याची टीकाही यावेळी खा. विशाल पाटील यांनी केली. 45 लाखांपर्यंतच्या घराला एक टक्के जीएसटी ची मर्यादा आहे. ही मर्यादा थोडी वाढवायला हवी, लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये छोट्या घटकांना आणल्यास अजून मोठा फायदा होऊ शकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.