Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह विधान राजू शेट्टी यांना भोवणार, सांगली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ ऑगस्ट २०२४
माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल अकोले येथे एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 124 अनुसार गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्या केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्याकडे केलीआहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सौ केळकर म्हणाल्या की, संकटात असलेल्यांना मदत करणे ही भारतीय संस्कृती असताना, व सर्वच विरोधी पक्ष एकत्र येऊन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या पाठीशी ठामपणे उभे असताना राजू शेट्टी यांनी देशद्रोही वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वत्र सन्मान मिळत आहे, देशात अराजक वाजवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये याची नोंद घेऊन सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांभाळून बोलले पाहिजे.


शेख हसिना यांना केवळ शेजारी देशाचे पंतप्रधान म्हणूनच नव्हे, तर स्त्री दाक्षिण्य म्हणूनही मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. अशावेळी देशविरोधी चिथावणीखोर वक्तव्य करणे, हे राजू शेट्टी यांना शोभत नाही. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक उमासे यांनी यासंदर्भात तपशील पडताळून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे मान्य केले आहे, असेही सौ. केळकर यांनी या वेळेला सांगितले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका राजू शेट्टी यांना भोवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.